Samsung च्या Popular 5G फोनचा सर्वात स्वस्त व्हेरिएंट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News

Updated on 29-Feb-2024
HIGHLIGHTS

Samsung Galaxy A15 5G स्मार्टफोनचा नवीन स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच

या नवीन व्हेरिएंटवर 1500 रुपयांचा बँक कॅशबॅक मिळेल.

Samsung Galaxy A15 5G फोन हेझ फिनिशमध्ये 'ग्लॅस्टिक' बॅक पॅनलसह येतो.

Samsung ने अलीकडेच आपला Samsung Galaxy A15 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला होता. त्यानंतर कंपनीने आपल्या Samsung Galaxy A15 5G स्मार्टफोनचा नवीन स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच केला आहे. या फोनचा नवीन स्टोरेज व्हेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. हा व्हेरिएंट कंपनीने बजेट किंमत श्रेणीमध्ये सादर केला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत-

हे सुद्धा वाचा: नवा Affordable स्मार्टफोन itel P55T फोन जंबो बॅटरीसह लाँच, किंमत 9000 रुपयांपेक्षा कमी। Tech News

Samsung Galaxy A15 5G

Samsung Galaxy A15 5G ची किंमत आणि ऑफर्स

Samsung Galaxy A15 5G स्मार्टफोन 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB अशा तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. Samsung Galaxy A15 5G च्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 22,499 रुपये आहे. तर, 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 19,499 रुपये आहे आणि 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

एवढेच नाही तर, नव्या व्हेरिएंवर ऑफर्सदेखील उपलब्ध आहेत. ग्राहकांना या नवीन व्हेरिएंटवर 1500 रुपयांचा बँक कॅशबॅक मिळू शकतो. या ऑफर्ससह हा फोन केवळ 16,499 रुपयांना खरेदी करता येईल. हा फोन Samsung.com आणि इतर ऑनलाइन स्टोअरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फोन ब्लु ब्लॅक, ब्लु आणि लाईट ब्लु कलर ऑप्शन्ससह सादर केला जातो.

Samsung Galaxy A15 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung चा हा बजेट स्मार्टफोन 6.5-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले ऑफर करतो. हा डिस्प्ले 90Hz रीफ्रेश रेटसह येतो. डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, फोन हेझ फिनिशमध्ये ‘ग्लॅस्टिक’ बॅक पॅनलसह येतो. या फोनच्या बाजूच्या पॅनलवर एक नवीन की-आयलँड डिझाईन आणि फ्लॅट लिनियर कॅमेरा उपलब्ध आहे. त्याबरोरबच, हा फोन MediaTek Dimensity 6100+ चीपसेट द्वारे समर्थित आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळेल. फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येईल.

Samsung Galaxy A15 5G Camera

या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये 5MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो शूटर देखील समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना आकर्षक सेल्फीसाठी 13MP फ्रंट कॅमेरा देखील मिळेल. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :