Samsung Galaxy A14 लवकरच भारतात दाखल होणार, बजेट प्राईसमध्ये मिळतील जबरदस्त फीचर्स

Samsung Galaxy A14 लवकरच भारतात दाखल होणार, बजेट प्राईसमध्ये मिळतील जबरदस्त फीचर्स
HIGHLIGHTS

Samsung Galaxy A14 भारतात लाँच होणार

फोनचे दोन्ही व्हेरियंट 4G रॅमसह येतील.

भारतात A14 ची सुरुवातीची किंमत INR 13,999 ठेवली जाऊ शकते.

Samsung ने अलीकडेच Galaxy A14 चे 4G व्हर्जन मलेशियामध्ये लाँच केले होते. मात्र, आता हा फोन भारतातही उपलब्ध होईल, अशा चर्चा सुरु आहेत. त्यामुळे यासोबतच ही गोष्ट तुमच्या मनात येत असेल की फोनची किंमत किती असेल? एका नवीन लीकनुसार, A14 4G भारतात दोन स्टोरेज कॉन्फिगरेशन, 64GB आणि 128GB मध्ये ऑफर केला जाईल. ज्याची किंमत अनुक्रमे INR 13,999 आणि INR 14,999 असेल. 

मात्र, अनेक ऑफर्सद्वारे ही फोनची किंमत बरीच कमी होईल. दोन्ही व्हेरियंट 4G रॅम सह येतील म्हणजेच त्यांच्यातील फरक फक्त स्टोरेजचा असेल, असेही सांगण्यात येत आहे. 

संभावित फीचर्स आणि स्पेक्स 

साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट सेन्सर फोनच्या पॉवर बटणामध्ये एम्बेड केलेले आहे. डिव्हाइस Android 13 वर आधारित One UI Core 5 वर चालेल. लोअर-एंड हार्डवेअरसाठी वापरल्या जाणार्‍या सॅमसंग स्किनची ही स्ट्रिप्ड डाउन आवृत्ती आहे. Galaxy A14 हे प्लास्टिकपासून बनवले आहे.

Galaxy A14 चे भारतीय लाँच लवकरच होणार आहे. हा स्मार्टफोन 6.6-इंच 1080×2408 60 Hz LCD टचस्क्रीन, MediaTek Helio G80 चिपसेट, 50MP मेन कॅमेरा, 5MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो कॅमेरा, 13MP सेल्फी स्नॅपर मिळेल. तसेच, बॅटरी बद्दल बोलायचे झाल्यास फोन 15W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरीद्वारे समर्थित आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo