भारतात अखेर लाँच झाला Samsung Galaxy A14, बजेट प्राईसमध्ये मिळतोय 50MP कॅमेरा
Samsung Galaxy A14 स्मार्टफोन भारतात लाँच
Samsung Galaxy A14 चे बेस मॉडेल 13,999 रुपयांना मिळेल.
स्मार्टफोन देशातील ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही स्टोअरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध
Samsung ने भारतात नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन Galaxy A14 ची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन फ्लॅगशिप S23 सिरीज स्मार्टफोन्स सारख्या डिझाइनसह येतो. Galaxy A14 मध्ये प्लास्टिक फ्रेम देण्यात आली आहे. Galaxy A14 चे 5G व्हर्जन देखील उपलब्ध आहे, जे 16,499 रुपयांमध्ये येईल. नव्याने लाँच झालेल्या फोनमध्ये तुम्हाला अप्रतिम फीचर्स मिळतात.
Samsung Galaxy A14
Galaxy A14 मध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंच FHD+ IPS LCD स्क्रीन आणि शीर्षस्थानी इन्फिनिटी-V स्टाइल नॉच आहे. डिव्हाइस Android 13 आधारित OneUI 5 core 5.1 वर चालतो. ब्रँडने पुष्टी केली आहे की, स्मार्टफोन 4 वर्षांच्या सिक्योरिटी पॅचसह Android 14 आणि 15 वर अपडेट केला जाईल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, Galaxy A14 Exynos 850 चिपसेटसह सुसज्ज आहे, जो 2GHz क्लॉक स्पीडने चालतो. हे उपकरण 4GB रॅम आणि 64/128GB स्टोरेजसह येईल. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो SD कार्ड स्लॉट देखील उपलब्ध आहे. डिव्हाइस ड्युअल नॅनो सिम कार्ड स्लॉटसह येतो आणि दोन्हीवर 4G LTE नेटवर्क सपोर्ट सुविधा आहे.
फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. तसेच, 13MP सेल्फी कॅमेरा समाविष्ट आहे. हँडसेट 5,000mAh बॅटरी आहे. फोन USB टाइप-C पोर्टद्वारे जलद चार्जिंगला सपोर्ट करतो.
किमंत :
4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह Samsung Galaxy A14 चे बेस मॉडेल 13,999 रुपयांना मिळेल. तर, 128GB वेरिएंटची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन देशातील ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही स्टोअरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile