Samsung च्या Galaxy-A सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन Galaxy A14 5G लॉन्च करण्यात आला आहे. हा बजेट फोन मागील Galaxy A13 5G ला रिप्लेस करेल. Samsung Galaxy A14 5G मध्ये 128GB स्टोरेज, मोठा डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी आहे. सॅमसंग लवकरच हा स्मार्टफोन भारतातही लॉन्च करू शकतो. सध्या हा स्मार्टफोन यूएस आणि काही युरोपियन मार्केटमध्ये सादर करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : BSNL : फक्त 19 रुपयांत तब्बल 90 दिवस चालेल 'हा' प्लॅन, इतर कंपन्यांचे देखील प्लॅन्स बघा
स्मार्टफोनसाठी प्लास्टिक पॉली कार्बोनेट बॅक पॅनल आणि फ्रेमचा वापर करण्यात आला आहे. Galaxy A14 फ्लॅट फ्रेम डिझाइनसह येतो. डिव्हाइसच्या मागील बाजूस तीन सर्क्युलर कटआउट आहेत. चला तर मग नवीन सॅमसंग फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल सर्वकाही जाणून घेऊयात…
Samsung Galaxy A14 5G च्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत $ 200 म्हणजेच सुमारे 16,500 रुपये आहे. याशिवाय 229 युरो म्हणजेच सुमारे 20,100 रुपयांमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज सादर करण्यात आले आहे. फोन ब्लॅक, सिल्व्हर, डार्क रेड आणि लाइट ग्रीन कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.
Samsung Galaxy A14 5G मध्ये 6.6-इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले आहे, जो फुल HD+ रिझोल्यूशन ऑफर करतो. डिस्प्लेच्या शीर्षस्थानी वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे, जो फ्रंट कॅमेरासाठी आहे. Galaxy A14 5G MediaTek Dimensity 700 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळत आहे, जे मायक्रो SD कार्डने वाढवता येते. फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळत आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Galaxy A14 5G च्या मागील बाजूस तीन कॅमेरे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये एक 50MP प्राथमिक सेन्सर आहे, दुसरा 2MP मॅक्रो कॅमेरा आहे आणि तिसरा 2MP डेप्थ सेन्सर आहे. सॅमसंगने फोनच्या फ्रंटला 13MP कॅमेरा दिला आहे. Android 13 सह स्मार्टफोनमध्ये OneUI 5.0 Core Edition चा समावेश करण्यात आला आहे. फोनमध्ये साइड फिंगरप्रिंट स्कॅनर, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि USB टाइप-C पोर्ट आहे.