Samsung Galaxy A14 भारतात 18 जानेवारीला लॉन्च होणार आहे. आता, 91mobiles ने विशेषतः Samsung Galaxy A14 बॉक्सच्या किंमतीबद्दल उद्योग स्रोतांकडून माहिती घेतली आहे. याआधी लीक झालेल्या फोनच्या मार्केटिंग पोस्टरमध्ये फोनची संपूर्ण फीचर्स समोर आली आहेत. Samsung Galaxy A14 हा Galaxy A13 चा सक्सेसर म्हणून येईल आणि त्याला 5G नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळेल.
SAMSUNG GALAXY A14 ची भारतीय किंमत लीक झाली आहे. जर स्त्रोतांवर विश्वास ठेवायचा असेल तर, Samsung Galaxy A14 ची बॉक्स किंमत 22,999 रुपये असेल. मात्र, फोनची वास्तविक किंमत 2,000-3,000 रुपये कमी असेल.
सॅमसंग गॅलेक्सी A14 स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी A14 ला 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंच लांबीचा FHD+ IPS LCD पॅनेल आणि वरच्या बाजूला वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसर 4GB/6GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेजसह जोडलेला असेल. डिव्हाइस Android 13-आधारित OneUI 5.0 सॉफ्टवेअरवर कार्य करतो.
त्याबरोबरच, Samsung Galaxy A14 5G ला 15W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 5,000mAh बॅटरी मिळत आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, GPS आणि USB टाइप-C पोर्ट समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. फोनच्या पुढील बाजूस 13MP सेल्फी आणि व्हिडिओ कॅमेरा उपलब्ध आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.