खुशखबर! Samsung Galaxy A14 5G फोन झाला 3 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत। Tech News

Updated on 20-Dec-2023
HIGHLIGHTS

Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात

Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

हा फोन ऑक्टा-कोर Exynos 1330 प्रोसेसरने सुसज्ज आहे.

Samsung चा लोकप्रिय Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोन कंपनीने हा फोन या वर्षी जानेवारीमध्ये लाँच केला होता. जवळपास वर्षभरानंतर आता कंपनीने या स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. होय, Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोन स्वस्त झाला आहे. हा फोन ऑक्टा-कोर एक्सीनोस 1330 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP आहे. जाणून घ्या फोनची नवीन किंमत आणि सर्व तपशील.

Samsung Galaxy A14 5G ची नवी किंमत

Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या फोनच्या 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,499 रुपये आहे. 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंट 18,999 रुपयांना येतो आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 20,999 रुपयांमध्ये येतो. कंपनीने या स्मार्टफोन्सच्या किमतीत तब्बल तीन हजार रुपयांनी घट केली आहे.

#image_title

कपातीनंतर, 4GB रॅम मॉडेलची किंमत 13,499 रुपये केली आहे. तर, 6GB आणि 8GB मॉडेलची किंमत अनुक्रमे 15,999 रुपये आणि 17,999 रुपये इतकी झाली आहे. या कपातीनंतर स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट तुम्हाला बजेट रेंजमध्ये मिळेल. हा फोन तुम्हाला डार्क रेड, लाईट ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शन्ससह मिळेल.

Samsung Galaxy A14 5G चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A14 5G फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. याशिवाय, फोन ऑक्टा-कोर Exynos 1330 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यासह तुम्हाला 8GB पर्यंत रॅम मिळेल. तर, फोनचे स्टोरेज 1TB पर्यंत आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 2MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP तिसरा कॅमेरा आणि 13MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, ज्यामध्ये 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :