Samsung च्या 5G फोनवर मिळतेय प्रचंड सवलत, किती स्वस्तात खरेदी करता येईल?

Updated on 11-Apr-2023
HIGHLIGHTS

Samsung galaxy A14 5G फोनवर भारी ऑफर्स

Amazon वर प्रचंड सवलतीसह उपलब्ध

बँक ऑफर्स आणि EMI ऑफर्स बघा

Samsung चा लेटेस्ट 5G फोन Amazon वर प्रचंड सवलतीसह उपलब्ध आहे. Samsung galaxy A14 5G फोनवर भारी ऑफर्स दिले जात आहे, याद्वारे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये हा फोन लाँच करू शकता. फोनवर तुम्हाला EMI ऑफर आणि एक्सचेंज ऑफर्स मिळणार आहेत. 

किंमत आणि ऑफर्स

या फोनची 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये आहे. पण, 10% डिस्काउंटसह 18,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय, बँक ऑफर्समध्ये SBI कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 1500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. तसेच, एस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास त्वरित 1,500 रुपयांची सूट मिळेल. HSBC कार्ड द्वारे पेमेंट केल्यास 2,000 रुपयांपर्यंत थेट सवलत मिळेल. 

याव्यतिरिक्त, जर तुम्हाला हा फोन आपल्या जुन्या किंवा विद्यमान फोनसह एक्सचेंज करायचा असेल. तर, यावर एकूण 17,800 रुपयांपर्यंत ऑफ मिळणार आहे. जर तुम्हाला या ऑफर्सचा संपूर्ण लाभ मिळाला तर, तुम्ही हा फोन केवळ 1,199 रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता. येथून खरेदी करा

Samsung galaxy A14 5G चे स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये तुम्हाला 6.6 इंच लांबीचा FHD+LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये तुम्हाला ऑक्टा- कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याबरोबरच, यामध्ये तुम्हाला 128GB पर्यंत स्टोरेज दिली गेली आहे. फोनला चार्ज करण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये, 50MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 13MP चा कॅमेरा उपलब्ध असणार आहे.     

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :