हँडसेट निर्माता Samsung ने आपला नवीन Samsung Galaxy A14 4G स्मार्टफोन ग्राहकांसाठी लाँच केला आहे. या सॅमसंग मोबाइल फोनमध्ये मोठी स्क्रीन, नवीनतम Android आवृत्तीसह ऑक्टा कोअर प्रोसेसर आणि बरेच काही आहे. आम्ही तुम्हाला या नवीनतम सॅमसंग स्मार्टफोनच्या किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
हे सुद्धा वाचा : अविश्वसनीय ! नेटवर्क नसतानाही करता येईल मॅसेज, Motorola ने लाँच केला अप्रतिम फोन
हे डिव्हाईस ग्राहकांसाठी कोणत्या किमतीत लाँच करण्यात आले आहे, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या हँडसेटची किंमत MYR 826 म्हणजेच सुमारे 15 हजार 300 रुपये असल्याचे बोलले जात आहे.
या Samsung फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा PLS LCD डिस्प्ले आहे, जो 90 Hz रीफ्रेश रेट ऑफर करतो. तसेच, डिवाइसमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, परंतु कंपनीने या हँडसेटमध्ये कोणता चिपसेट वापरला आहे याची माहिती मिळालेली नाही, परंतु असे सांगितले जात आहे की यात MediaTek Helio G80 प्रोसेसर आहे.
फोनमध्ये 6 GB रॅमसह 128 GB स्टोरेज आहे, जे मायक्रो SD कार्डच्या मदतीने 1 TB पर्यंत वाढवता येते. हा फोन Android 13 वर आधारित One UI 5.0 वर काम करतो. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W चार्जिंगला सपोर्ट करते.
फोनच्या मागील पॅनलवर तीन कॅमेरे आहेत, 50 मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा समोर आहे.