50MP कॅमेरासह Samsung Galaxy A06 फोन भारतात लाँच, किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी 

 50MP कॅमेरासह Samsung Galaxy A06 फोन भारतात लाँच, किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी 
HIGHLIGHTS

नुकतेच Samsung Galaxy A06 स्मार्टफोन भारतात लाँच

Samsung Galaxy A06 स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

बजेट रेंजमध्ये हा स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी 50MP प्राथमिक कॅमेरा प्रदान करतो.

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Samsung चे बजेट रेंजपासून ते एक्सपेन्सिव्ह स्मार्टफोन ऑफर करते. दरम्यान, कंपनीने नुकतेच Samsung Galaxy A06 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा नवीन बजेट स्मार्टफोन आहे. बजेट रेंजमध्ये हा स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी 50MP प्राथमिक कॅमेरा प्रदान करतो. तर, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. चला तर मग जाणून घेऊयात या फोनची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: Limited Time Deal! देशी LAVA कंपनीचा 5G स्मार्टफोन झाला अतिशय स्वस्त, पुन्हा मिळणार नाही इतकी मोठी ऑफर

 Samsung Galaxy A06 फोन भारतात लाँच

Samsung Galaxy A06 ची भारतीय किंमत

Samsung ने Samsung Galaxy A06 स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. तर, या फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,499 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते. हा फोन लाईट ब्लु, ब्लॅक आणि गोल्डन कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे.

Samsung Galaxy A06 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A06 फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा LCD HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Helio G85 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा प्रोसेसर बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोनसाठी प्रशंसनीय अनुभव प्रदान करतो. चिपसेट सर्वात लोकप्रिय गेम सहजतेने हाताळू शकतो. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

 Samsung Galaxy A06 फोन भारतात लाँच

स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB आणि 128GB स्टोरेज मिळणार आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. सोबत 2MP डेप्थ सेन्सर समाविष्ट आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo