Samsung Galaxy A05s स्मरफोनमध्ये 50MP मेन सेन्सर उपलब्ध
विशेषतः या फोनचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.
तुम्ही Samsung कडून बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Samsung Galaxy A05s खरेदी करू शकता. सध्या कंपनी आपल्या हँडसेटच्या किमतीत कपात करत आहेत. त्यामध्ये आणखी एक स्मार्टफोन समाविष्ट झाले आहे. मागील वर्षी भारतात लाँच झालेल्या या स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या Galaxy A-सिरीज हँडसेटची किंमत 2000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
Samsung Galaxy A05s ची नवी किंमत
Samsung Galaxy A05s मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात 14,999 रुपये किमतीत लाँच करण्यात आला होता. त्यानंतर वर सांगितल्याप्रमाणे या फोनच्या किमतीत 2000 रुपयांची घट झाली आहे. त्यानंतर हा फोन तुम्हाला केवळ 12,999 रुपयांना खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन ब्लॅक, लाइट ग्रीन आणि लाइट व्हायलेट या तीन कलर ऑप्शन्समध्ये मिळणार आहे.
Samsung Galaxy A05s चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Samsungचे हे परवडणारे उपकरण 6.7-इंच लांबीच्या FHD+ डिस्प्लेसह सुसज्ज आहे. परफॉर्मन्ससाठी, या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट आहे. हा डिव्हाइस Android 13 OS वर कार्य करेल. जो 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह जोडलेला आहे. विशेषतः या फोनचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. सुरक्षिततेसाठी यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये 50MP मुख्य सेन्सर, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येते. या बॅटरीमध्ये सिंगल चार्जवर वेब सर्फिंगसारख्या मूलभूत कार्यांसह दोन दिवस टिकण्याची क्षमता आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.