Samsung चा Affordable स्मार्टफोन Galaxy A05s नवीन अवतारात भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसीफिकेशन्स 

Samsung चा Affordable स्मार्टफोन Galaxy A05s नवीन अवतारात भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसीफिकेशन्स 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy A05s चे 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलही भारतीय बाजारात लाँच

SBI क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांना 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील दिला जाईल.

फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्टसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

Samsung ने पुन्हा एकदा भारतात परवडणारा स्मार्टफोन Galaxy A05s लाँच केला आहे. खरं तर, हा फोन भारतात गेल्या महिन्यातच लाँच झाला होता. मात्र, आता या फोनचे 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलही भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहे. चला जाणून घेऊया सॅमसंगच्या या अप्रतिम फोनची किंमत आणि इतर सर्व तपशील-

Samsung Galaxy A05s ची किंमत

पूर्वी Samsung Galaxy A05s स्मार्टफोनचे 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल लाँच करण्यात आले होते. या फोनची किंमत 12,499 रुपये आहे. हा फोन तुम्ही लाईट ग्रीन, लाईट व्हॉयलेट आणि ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकता. याशिवाय, फोनच्या 6GB रॅम मॉडेलची किंमत 14,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Samsung Galaxy A05s top feature
Samsung Galaxy A05s

एवढेच नाही तर, स्पेशल ऑफर अंतर्गत ग्राहकांना बँका आणि NBFCs सोबत 1,150 रुपये प्रति महिना EMI वर Samsung Finance+ खरेदी करण्याची संधी आहे. याशिवाय, SBI क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांना 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील दिला जाईल.

Samsung Galaxy A05s

या फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे. Samsung Galaxy A05s स्मार्टफोनमध्ये ग्राहकांसाठी ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा एक बजेट प्रोसेसर आहे. याशिवाय फोनमध्ये 6GB रॅम देखील देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला 128GB पर्यंत स्टोरेज मिळेल, जी तुम्हाला 1TB पर्यंत वाढवता शकता. Samsung Galaxy A05s स्मार्टफोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

फोनमध्ये Android 13 सपोर्ट आहे. याशिवाय फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्टसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या सॅमसंग फोनमध्ये ग्राहकांना 50MP मेन कॅमेरा मिळतो, त्यात 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13MP सेल्फी कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळेल, जी 25W फास्ट चार्जिंगसह येते. या फोनमध्ये तुम्हाला एका चार्जमध्ये 2 दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळतो, असा दावा कंपनीने केला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo