Samsung ने भारतात आणखी एक बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे, जो गेल्या वर्षी लाँच झालेल्या Galaxy A04s ची अपग्रेडेड आवृत्ती आहे. होय, प्रसिद्ध कंपनीने Samsung Galaxy A05s बजेट श्रेणीमध्ये लाँच केला आहे. कंपनीने आपल्या नव्या बजेट स्मार्टफोनच्या फीचर्समध्ये गेल्या वर्षीच्या मॉडेलच्या तुलनेत अनेक सुधारणा केल्या आहेत. या स्मार्टफोनचा लुक आणि डिझाईन या वर्षी आलेल्या Samsung Galaxy S23 सीरीज प्रमाणे आहे. चला बघुयात नव्या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसीफिकेशन्स.
हे सुद्धा वाचा: Price Cut! Apple Pad झाला स्वस्त, 5000 रुपयांच्या कपातीसह एकूण 9 हजार रुपयांचा लाभ, बघा Attractive ऑफर। Tech News
Galaxy A05s 6GB RAM + 128GB या एकाच स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या नव्या फोनची किंमत 14,999 रुपये आहे. त्याबरोबरच, SBI कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला 1,000 रुपयांची सूट देखील मिळणार आहे. याशिवाय, वेलकम कार्डच्या स्वरूपात 2,000 रुपयांची सूट मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही हा फोन ब्लॅक, लाइट ग्रीन आणि लाइट व्हायलेट या तीन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकता.
या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे. फोनच्या डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप नॉच फीचर उपलब्ध आहे. सॅमसंगचा हा बजेट स्मार्टफोन स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Qualcomm Snapdragon 680 octacore प्रोसेसर सह येतो. यात 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट आहे. या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 6GB व्हर्च्युअल रॅम देखील मिळेल. तर, इंटर्नल स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल. या स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिजिकल सेन्सर उपलब्ध आहे.
फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. ज्यामध्ये 50MP मेन कॅमेरा आहे, जो OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फिचरला सपोर्ट करतो. याशिवाय, मागील बाजूस 2MP खोली आणि 2MP मॅक्रो सेन्सर उपलब्ध आहे. यात आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP कॅमेरा आहे. त्याबरोबरच, यात 5,000mAh बॅटरी आहे, जी 25W USB टाइप C चार्जिंगला सपोर्ट करते. डॉल्बी ATMOS, ब्लूटूथ, Wi-Fi सारखे फीचर्सही फोनमध्ये आहेत.