लेटेस्ट Samsung Galaxy M05 फोन भारतीय बाजारात लाँच! पहा किंमत आणि Powerful फीचर्स 

लेटेस्ट Samsung Galaxy M05 फोन भारतीय बाजारात लाँच! पहा किंमत आणि Powerful फीचर्स 
HIGHLIGHTS

नवा स्मार्टफोन Samsung Galaxy M05 भारतात लाँच करण्यात आला आहे.

Samsung Galaxy M05 फोनची किंमत कंपनीने केवळ 8000 रुपयांच्या अंतर्गत ठेवली आहे.

Samsung Galaxy M05 फोनमध्ये सिक्योरिटी अपडेट 4 वर्षांसाठी उपलब्ध असतील.

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Samsung ने आपला नवा स्मार्टफोन Samsung Galaxy M05 भारतात लाँच केला आहे. लक्षात घ्या की, हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये अनेक दमदार आणि जबरदस्त फीचर्स मिळणार आहेत. या फोनची किंमत कंपनीने केवळ 8000 रुपयांच्या अंतर्गत ठेवली आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि पॉवरसाठी मोठी बॅटरी देखील मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy M05 फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: 50MP सेल्फी कॅमेरासह Vivo T3 Ultra 5G फोन भारतात लाँच! तुमच्या बजेटमध्ये आहे का किंमत?

Samsung Galaxy M05 ची भारतीय किंमत

Samsung ने Samsung Galaxy M05 फोनच्या 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंट 7,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. लक्षात घ्या की, हा स्मार्टफोनमध्ये मिंट ग्रीन कलर ऑप्शन्ससह लाँच करण्यात आला आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon India आणि Samsung च्या अधिकृत साईटवर सुरु होईल.

Samsung Galaxy M05 launched in india

Samsung Galaxy M05 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M05 फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन MediaTek Helio G85 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4GB रॅम + 64GB स्टोरेज वेरिएंट आहे. फोनची स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल. कंपनी या फोनसोबत 2 वर्षांसाठी ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स देईल. याशिवाय, यामध्ये सिक्योरिटी अपडेट 4 वर्षांसाठी उपलब्ध असतील.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP चा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच 2MP डेप्थ सेन्सर देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. यामध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo