Samsung Galaxy a05 हा Affordable स्मार्टफोन लवकरच भारतात होणार दाखल, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि लाँच डेट 

Samsung Galaxy a05 हा Affordable स्मार्टफोन लवकरच भारतात होणार दाखल, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि लाँच डेट 
HIGHLIGHTS

Samsung ने Samsung Galaxy A05 ग्लोबली सादर करून आपल्या Galaxy 'A' सिरीजचा विस्तार केला.

हा स्वस्त स्मार्टफोन आता भारतीय बाजारपेठेत दाखल होण्यास सज्ज झाला आहे.

Samsung Galaxy A05 भारतात नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो.

Samsung ने सप्टेंबर महिन्यात Samsung Galaxy A05 ग्लोबली सादर करून आपल्या Galaxy ‘A’ सिरीजचा विस्तार केला. हा स्वस्त स्मार्टफोन आता भारतीय बाजारपेठेत दाखल होण्यास सज्ज झाला आहे. अलीकडेच सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर या फोनचे सपोर्ट पेज लाईव्ह करण्यात आले होते, तर आता कंपनीच्या वेबसाइटद्वारे या मोबाइलचे यूजर मॅन्युअल देखील पुढे आले आहे. खरं तर, सॅमसंगने अद्याप आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

पण या स्मार्टफोनचे यूजर मॅन्युअल कंपनीच्या वेबसाइटवर सार्वजनिक करण्यात आले आहे. येथे, फोनच्या नावासह त्याच्या डिझाइनचे तपशील देखील उपलब्ध आहेत. जे Samsung Galaxy A05 इंडिया लाँच कन्फर्म करतात.

Samsung Galaxy a05 संभावित लाँच

कंपनी लवकरच Samsung Galaxy a05 मोबाईल भारतीय बाजारात लाँच करू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. दिवाळीनंतर हा स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. म्हणजेच Samsung Galaxy A05 भारतात नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो. मात्र लक्षात घ्या की, कंपनीने या लाँचबाबत अद्याप कोणतीही माहिती अधिकृतपणे शेअर केली नाही.

samsung galaxy a05

Samsung Galaxy a05

हा स्मार्टफोन ग्लोबली आधीच लाँच करण्यात आला आहे. त्यानुसार, Samsung Galaxy A05 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुलएचडी + डिस्प्ले आहे. हा फोन Android आधारित OneUI वर लाँच करण्यात आला आहे, फोनमध्ये MediaTek Helio G85 ऑक्टा-कोर प्रोसेसर प्रोसेसिंगसाठी प्रदान करण्यात आला आहे. तसेच, यासह 6GB रॅमसह लाँच केला आहे, जो 128GB अंतर्गत स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे. त्याच्या मागील पॅनलमध्ये 50MP चा प्रायमरी सेन्सर आणि 2MP चा सेकंडरी लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा फोन 8MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी वेब सर्फिंग सारख्या मूलभूत कार्यांसह दोन दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवते. फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोन 3.5 मिमी जॅकसह ब्लूटूथ, Wi-Fi आणि ड्युअल सिम सारख्या फीचर्सना समर्थन देतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo