50 मेगापिक्सेल कॅमेराने सुसज्ज असलेला स्वस्त SAMSUNG स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत

50 मेगापिक्सेल कॅमेराने सुसज्ज असलेला स्वस्त SAMSUNG स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत
HIGHLIGHTS

Samsung Galaxy A04s स्मार्टफोन भारतात लाँच

नव्या स्मार्टफोनची किंमत 13,499 रुपये

SBI च्या बँक कार्डने पेमेंट केल्यावर तुम्हाला 1,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

Samsung ने भारतात Samsung Galaxy A04s लॉन्च केला आहे. Samsung Galaxy A04s सह Exynos 850 प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय, Samsung Galaxy A04s मध्ये 6.5-इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश दर 90Hz आहे. Samsung Galaxy A04s मध्ये 4G सपोर्ट देण्यात आला आहे. या सॅमसंग फोनसोबत डॉल्बी ATMOS चाही सपोर्ट देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : 108MP कॅमेरा असलेला Motorolaचा मस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स

Samsung Galaxy A04s चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy A04s मध्ये Android 12 सह One UI Core 4.1 आहे. याशिवाय, यात 90Hz च्या रीफ्रेश दरासह 6.5-इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले आहे. यात Exynos 850 प्रोसेसरसह 4 GB RAM आणि 4 GB व्हर्च्युअल रॅम आहे.

 त्याबरोबरच, Samsung Galaxy A04s मध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यात प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल आहे. दुसरी लेन्स 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे आणि तिसरी लेन्स देखील 2-मेगापिक्सेल मॅक्रो आहे. सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त कनेक्टिव्हिटीसाठी, यात 4G LTE, Wi-Fi 802.11ac, Bluetooth v5 आणि GPS/A-GPS आहे. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या सॅमसंग फोनमध्ये 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे.

Samsung Galaxy A04s किंमत

Samsung Galaxy A04s ची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतीत 4 GB रॅम सह 64 GB स्टोरेज देण्यात आले आहे. फोनची विक्री सॅमसंगच्या साइट आणि रिटेल स्टोअर्सद्वारे केली जाईल. लॉन्चिंग ऑफर अंतर्गत, SBI च्या बँक कार्डने पेमेंट केल्यावर तुम्हाला 1,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. Samsung Galaxy A04s ब्लॅक, कॉपर आणि ग्रीन कलरमध्ये खरेदी केले जाऊ शकतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo