Samsung ने आपला नवीन Galaxy A सीरीज स्मार्टफोन Samsung Galaxy A04 लाँच केला आहे. हा फोन गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच झालेल्या Galaxy A03 चा सक्सेसर म्हणून लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये कंपनी 50 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देत आहे. फोनची किंमत आणि उपलब्धता याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. तथापि, अलीकडेच एक अहवाल आला आहे, ज्यात म्हटले आहे की त्याची किंमत 169 युरो म्हणजेच सुमारे 13,400 रुपये असेल. कंपनीचा हा नवीनतम हँडसेट ब्लॅक, व्हाइट, ग्रीन आणि कॉपर कलर पर्यायांमध्ये येतो.
हे सुद्धा वाचा : Vikram Vedha Teaser Out: 'विक्रम वेधा'च्या टीझरमध्ये सैफ-हृतिकचा जलवा, बघा व्हिडिओ
कंपनी फोनमध्ये 6.5-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले Infinity-V नॉच डिझाइनचा आहे. हा सॅमसंग फोन 4 GB + 32 GB, 6 GB + 64 GB आणि 8 GB + 128 GB अशा चार व्हेरिएंटमध्ये येतो. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Exynos 850 चिपसेट देत आहे.
याव्यतिरिक्त, हा फोन Android 12 वर आधारित OneUI Core 4.1 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ड्युअल सिम, 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, USB टाइप-C पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक असे ऑप्शन देण्यात आले आहेत.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 50-मेगापिक्सेलच्या प्रायमरी कॅमेरासह 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. तसेच कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. सॅमसंगचा हा नवीनतम बजेट स्मार्टफोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे.