TENAA नंतर ब्लूटूथ SIG वर दिसला Samsung Galaxy A Star

TENAA नंतर ब्लूटूथ SIG वर दिसला Samsung Galaxy A Star
HIGHLIGHTS

Galaxy A Star मध्ये एक्सीनोस 7885 प्रोसेसर आणि 6GB रॅम असू शकतो तसेच डिवाइस मध्ये 3,700 mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy A Star साउथ कोरियन कंपनी चा आगामी स्मार्टफोन आहे. मागच्या महिन्यात हा डिवाइस चीन च्या रेगुलेटरी एजेंसी TENAA वर दिसला होता. त्यावेळी वाटले होते हा डिवाइस फक्त चीन मध्ये लॉन्च केला जाईल पण ब्लूटूथ SIG वर पाहिल्यानंतर Galaxy A Star ची उपलब्धता क्लियर झाली आहे. 
असे वाटते आहे कंपनी हा स्मार्टफोन चीन आणि ग्लोबली लॉन्च करेल पण वेगवेगळी नावे Galaxy A Star Galaxy A8 Star सह. पण अजून या डिवाइस ला ब्लूटूथ सर्टिफिकेशन मिळाले नाही आणि लिस्ट मधून डिवाइस च्या अन्य स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली नाही. 
यात हे स्पेसिफिकेशन्स असू शकतात 
TENAA वर दिसलेल्या मागील माहितीच्या आधारे चिन मध्ये लॉन्च होणार्‍या डिवाइस च्या वर्जन मध्ये 6.3 इंचाचा इनफिनिटी डिस्प्ले असेल जो FHD+ रेजोल्यूशन सह येईल आणि डिवाइस मध्ये डुअल रियर कॅमेरा असेल. Galaxy A Star मध्ये एक्सीनोस 7885 प्रोसेसर आणि 6GB रॅम असू शकतो तसेच डिवाइस मध्ये 3,700 mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे. अशा आहे की लवकरच हा डिवाइस लॉन्च केला जाईल. 
गीकबेंच वर दिसला Galaxy Note 9
त्याचबरोबर Galaxy Note 9 पण गीकबेंच वर दिसला आहे, हा US मध्ये लॉन्च होणारा Note 9 असू शकतो, कारण Samsung Galaxy Note 8 चा US वेरिएंट SM-N950U मॉडेल नंबर सह दिसला होता. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर आणि 6GB रॅम सह लिस्टेड करण्यात आला आहे. हा डिवाइस दुसर्‍यांदा गीकबेंच वर दिसला आहे याआधी हा डिवाइस मार्च महिन्यात गीकबेंच वर दिसला होता याच्या स्नॅपड्रॅगन 845, एंड्राइड ओरियो आणि रॅम चा खुलासा झाला होता. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo