सॅमसंग 11 ऑक्टोबरला आपल्या एका इवेंटचे आयोजन करणार आहे. असे बोलले जात आहे की या इवेंट मधून Samsung एक चार कॅमेरे असलेला स्मार्टफोन लॉन्च करू शकते. असे पण बोलले जात आहे की सॅमसंग कडून या इवेंट मध्ये Galaxy A सीरीजचा आगामी फोन लॉन्च केला जाऊ शकतो. पण या नवीन बातमी व्यतिरिक्त या Galaxy A सीरीज च्या डिवाइस बद्दल इतर कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण इतर बातम्या असे सांगतात की हा सॅमसंग गॅलेक्सी A सीरीज चा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर सह लॉन्च केला जाऊ शकतो. असे पण समोर येत आहे की या इवेंट मधून एक असा गॅलेक्सी स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे जो आता पर्यंत कोणी बघितला नसेल.
पण तुम्हाला तर माहितीच आहे की गॅलेक्सी ए सीरीज मध्ये सॅमसंग मिड-रेंज फोन्स लॉन्च करते. जर आपण सॅमसंग गॅलेक्सी एस9 किंवा सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 सीरीज बद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या तुलनेत स्नॅपड्रॅगन 845 सह नवीन आगामी गॅलेक्सी A सीरीज स्मार्टफोन कमी किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो.
गॅलेक्सी ए सीरीज संबंधीत समोर येणारी माहिती टिपस्टर @MMDDJ_ यांच्या माध्यामातून समोर येत आहे. इथे तुम्ही ते ट्विट बघू शकता. या ट्विट मधून तुम्हाला जास्त माहिती मिळणार नाही पण एवढे मात्र समोर येत आहे की आगामी सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीज चा फोन स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च केला जाऊ शकतो.
https://twitter.com/MMDDJ_/status/1040977048154497029?ref_src=twsrc%5Etfw
आता गेल्याच महिन्यात सॅमसंग ने भारतात त्यांचा सॅमसंग गॅलेक्सी ए8 स्टार लॉन्च केला होता. Samsung Galaxy A8 Star मध्ये 6.3 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 SoC ओक्टा कोर CPU आहे ज्याचे चार कोर्स 2.2GHz च्या स्पीड वर क्लोक्ड आहेत तर दुसरे चार कोर्स 1.8GHz वर क्लोक्ड आहेत. डिवाइस मध्ये 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे तसेच याची स्टोरेज माइक्रो SD कार्ड ने वाढवता येते.
या स्मार्टफोन मध्ये 3,700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 1.67A वर फास्ट चार्जिंग ऑफर करते. कनेक्टिविटी पर्यायांमध्ये डुअल-सिम, ब्लूटूथ, Wi-Fi आणि USB टाइप-C उपलब्ध आहेत. स्मार्टफोन एंड्राइड ओरियो सह सॅमसंग एक्सपीरियंस UI वर चालतो.