सॅमसंगच्या Galaxy J2 Core, Galaxy J2 2018, Galaxy J4 आणि Galaxy J6 मोबाईल फोन्सच्या किंमतीवर डिस्काउंट दिला जात आहे आणि हि ऑफर 15 नोव्हेंबर पर्यंत चालू राहील.
ई-कॉमर्स कंपन्या म्हणजे फ्लिपकार्ट, अमेझॉन किंवा पेटीएम मॉल यांच्यात सणासुदीच्या काळात सेलचे आयोजन करण्यात चढाओढ सुरु आहे तसेच जर स्मार्टफोन, गॅजेट्स किंवा लॅपटॉप बनवणाऱ्या कंपन्या बद्दल बोलायचे झाले तर त्यापण काही मागे राहिल्या नाहीत. त्यापण आपल्या प्रोडक्ट्स वर भरभक्कम डिस्काउंट देत आहेत. सॅमसंग बद्दल बोलायचे तर कंपनीने आपल्या J सीरीजच्या चार मोबाईल फोन्सच्या किंमतीती कपात केली आहे ज्यामुळे हे फोन्स कमी किंमतीत विकत घेता येतील.
हि माहित मुंबई मधील महेश टेलिकॉमच्या ट्विटर हँडल वरून समोर आली आहे. ज्यावरून समजते कि सॅमसंगच्या 4 फोन्सची किंमती कमी करण्यात आहेत. पण हि ऑफर 25 ऑक्टोबर पासून 15 नोव्हेंबर पर्यंत चालू असेल. या काळात तुम्ही हे मोबाईल फोन्स कमी किंमतीत विकत घेऊ शकता. Samsung च्या या चार फोन्स मध्ये Galaxy J2 Core, Galaxy J2 2018, Galaxy J4 आणि Galaxy J6 च्या नावांचा समावेश आहे.
सेल मध्ये Galaxy J2 कोर 7,000 रुपयांऐवजी 5,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच Galaxy J2 2018 बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस 8,200 रुपयांऐवजी 6,990 रुपयांमध्ये मिळत आहे.
जर तुम्ही गॅलेक्सी J4 मोबाईल फोन विकत घेण्याचा विचार करत असला तर हा 10,990 रुपयांच्या ऐवजी 8,250 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. Galaxy J6 चा 32GB वेरिएंट सेल मध्ये 11,490 रुपयांमध्ये विकला जात आहे तसेच डिवाइसचा 64GB वेरिएंट फक्त 12,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.