Samsung च्या फोल्डेबल फोनची प्री-बुकिंग आजपासून सुरू, 40,000 रुपयांपर्यंत गिफ्ट्स मिळवण्याची संधी

Updated on 16-Aug-2022
HIGHLIGHTS

आजपासून Samsung च्या फोल्डेबल फोनची प्री-बुकिंग सुरू

प्री बुकिंग कंपनीच्या वेबसाईटवर 12 वाजतापासून सुरु होणार

तसेच, सॅमसंगचे लेटेस्ट बड्स आणि स्मार्टवॉचची प्रीबुकिंग आजपासून सुरु

Samsung Galaxy Z fold 4 आणि Z Flip 4 नुकतेच लाँच झाले आहेत. हे फोल्डेबल स्मार्टफोन आजपासून भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होतील. नवीन फोल्डेबल फोन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध असतील. जर तुम्ही या स्मार्टफोन्सचे प्री-बुकिंग करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही काही खास फायदे आणि ऑफर्सचाही लाभ घेऊ शकाल. 

फोनबरोबर, आज Samsung Galaxy Buds 2 Pro आणि Samsung चे लेटेस्ट स्मार्टवॉच – Galaxy Watch 5 आणि Galaxy Watch 5 Pro देखील पहिल्यांदाच प्री-बुक केले जाऊ शकतात. तुम्ही Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 प्रीबुक केल्यावर तुम्हाला कोणते ऑफर आणि फायदे मिळतील ते  जाणून घेऊयात… 

हे सुद्धा वाचा : Moto Razr 2022: 50MP कॅमेरा आणि 12GB RAM असलेला स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स 

सॅमसंग फोल्डेबल फोन ऑनलाइन प्रीबुक कसे कराल ?

Qualcomm च्या Snapdragon 8+ Gen 1 समर्थित Samsung Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 साठी प्री-बुकिंग 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. तुम्ही या फोल्डेबल स्मार्टफोन्सचे प्रीबुकिंग केल्यास, तुम्हाला रु.40,000 पेक्षा जास्त किमतीच्या मोफत भेटवस्तू मिळतील.

या फोन्ससोबत तुम्हाला 5,199 रुपयांचे स्पेशल गिफ्ट व्हाउचर मिळेल. तसेच, तुम्ही Galaxy Z Flip 4 घेण्याचा विचार करत असाल तर त्याच्या bespoke वर्जनच्या प्रीबुकिंग दरम्यान, तुम्हाला 2,000 रुपयांचे स्लिम क्लिअर कव्हर मिळेल. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन हे स्मार्टफोन प्री-बुकिंग करून तुम्ही 5000 रुपये  अतिरिक्त लाभ मिळवू शकता. 

Samsung Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 प्री-बुकिंग करण्यासाठी तुम्हाला फक्त 1,999 रुपये खर्च लागणार आहे.

मात्र, भारतासाठी Z Flip 4 आणि Z Fold 4 ची अधिकृत किंमत अद्याप उघड झालेली नाही. जागतिक बाजारात Galaxy Z Flip 4 ची किंमत $999 पासून सुरू होते, जी भारतात अंदाजे रु.79,000 आहे. त्याचप्रमाणे, Samsung Galaxy Z Fold 4 ची सुरुवातीची किंमत $1,799.99 म्हणजेच अंदाजे 1,42,700 रुपये आहे.

याशिवाय, Samsung Galaxy Buds 2 Pro आणि Samsung चे नवीनतम स्मार्टवॉच – Galaxy Watch 5 आणि Galaxy Watch 5 Pro देखील आजपासून म्हणजेच 16 ऑगस्टपासून भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध असतील.  या विशेष ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहेत, जे 12 ऑगस्ट 17 पर्यंत सुरू राहतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :