मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंग लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन फ्लिप सादर करणार आहे. हा स्मार्टफोन 3GB रॅमने सुसज्ज असेल अशी माहिती मिळतेय. मागील काही दिवसांपासून टेक जगतात अशी चर्चा सुरु आहे की, सॅमसंग आपल्या नवीन डिवाईसवर काम करत आहे, जो फ्लिप डिझाईनमध्ये उपलब्ध असेल.
खरे पाहता, चीन वेबसाइट टीनाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, ह्या फोनचे नाव गॅलेक्सी गोल्डन 3 असेल. सध्यातरी, ह्या स्मार्टफोनचे कोणतेही फोटो समोर आले नाही, मात्र ह्याच्या वैशिष्ट्यांविषयी नक्कीच थोडी माहिती मिळाली आहे.
लीक्सनुसार, सॅमसंग गॅलेक्सी गोल्डन 3 मध्ये ३.९ इंचाची HD स्क्रीन असेल, ज्याचे रिझोल्युशन 768×1280 पिक्सेल असू शकते.
ह्याआधी अशी माहिती मिळाली होती की, ह्यात ४.७ इंचाची डिस्प्ले असेल. त्याचबरोबर फोनमध्ये 3GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेज असेल. हा स्मार्टफोन 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. त्याचबरोबर ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा असू शकतो.