Samsung चा हा आगामी स्मार्टफोन Galaxy A9 (2019) असेल जो चार रियर कॅमेरा सेटअप सह सादर केला जाईल.
यंदा आपण असे स्मार्टफोन्स बघितले आहेत जे ट्रिपल कॅमेरा सेटअप सह येतात. प्रसिद्ध लीक्स्टर Ice Universe च्या लेटेस्ट ट्वीट नुसार, असे समोर आले आहे की सॅमसंग लवकरच चार रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च करेल आणि हा स्मार्टफोन यावर्षीच्या शेवटपर्यंत सादर केला जाऊ शकतो.
या ट्वीट वर विश्वास ठेवल्यास हा डिवाइस या वर्षी लॉन्च केला जाईल, त्यामुळे हा Galaxy S सीरीजचा फ्लॅगशिप फोन किंवा Galaxy Note डिवाइस नसेल, कारण गेल्या महिन्यातच Note 9 लॉन्च करण्यात आला आहे. जर Galaxy S आणि Note लाइन अप बाजूला ठेवली तर हा A सीरीजचा स्मार्टफोन asu शकतो, ज्याचा अर्थ असा की हा आगामी स्मार्टफोन Galaxy A9 (2019) असेल.
परंतु, ट्वीट चा दुसरा अर्थ हा पण असू शकतो की डिवाइसच्या बॅक आणि फ्रंटला डुअल कॅमेरा सेटअप आहे. पण ट्वीट ची पद्धत पाहता हा चार रियर कॅमेरा सह येणारा डिवाइस असेल याची आशा जास्त आहे.
साध्यतरी Huawei चा P20 Pro स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. Huawei P20 Pro मधील ट्रिपल कॅमेरा मध्ये 40 MP RGB 1/1.7-इंच सेंसर, 20 MP मोनोक्रोम सेंसर आणि 8MP टेलीफोटो लेंस आहे. डिवाइस च्या फ्रंटला 24.8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे जो 3D पोर्ट्रेट लाइट इफेक्ट ला सपोर्ट करतो. हा डिवाइस 360 फेस अनलॉक फीचर सह येतो जो काही सेकंदात डिवाइसला अनलॉक करू शकतो.