SAMSUNG ची अप्रतिम कॉम्बो डील ! ‘हा’ फोन खरेदी केल्यास 3 हजारमध्ये मिळेल 32 हजारांचे स्मार्टवॉच

SAMSUNG ची अप्रतिम कॉम्बो डील ! ‘हा’ फोन खरेदी केल्यास 3 हजारमध्ये मिळेल 32 हजारांचे स्मार्टवॉच
HIGHLIGHTS

दिवाळीनिमित्त SAMSUNG ची सर्वात भारी कॉम्बो डील

Galaxy Z Flip 4 खरेदी करा आणि 32 हजारांचे स्मार्टवॉच फक्त 3 हजारांमध्ये मिळवा.

HDFC बँक कार्डने व्यवहार केल्यास 7,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक

SAMSUNG ने भारतीय वापरकर्त्यांसाठी दिवाळी धमाकेदार बनवण्यासाठी एक उत्तम कॉम्बो डील आणली आहे. या डील अंतर्गत फोन खरेदी केल्यास तुम्हाला रु. 31,999 च्या किंमत टॅगसह एक स्मार्टवॉच Galaxy Watch 4 Classic फक्त रु. 2,999 मध्ये मिळेल. Galaxy Z Flip 4 (8GB+128GB) व्हेरिएंट स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ही डील अगदीच भारी ठरेल. SAMSUNG च्या या फ्लिप फोनची किंमत कंपनीच्या वेबसाइटवर 89,999 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा : Android वरून iOS वर WhatsApp डेटा कसा ट्रान्सफर करायचा? बघा अगदी सोपा मार्ग

जर तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी HDFC बँक कार्डने व्यवहार करत असाल, तर तुम्हाला 7,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक देखील मिळेल. याशिवाय, कंपनी SAMSUNG शॉप या ऍपवरून हा फोन खरेदी करण्यावर 2,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट देखील देत आहे. या दोन्ही डीलसह, Galaxy Z Flip 4 तुम्हाला 80,999 रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.

Samsung Galaxy Z Flip 4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

कंपनी फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD + AMOLED डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देखील देत आहे. याशिवाय फोनमध्ये 1.9-इंच लांबीचा सुपर AMOLED आऊटर डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. 

प्रोसेसर म्हणून यामध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 3700mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याबरोबरच, हा फोन Android 12 वर आधारित OneUI 4.1 वर काम करतो.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये दोन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 12-मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेरासह 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा समाविष्ट आहे. तर, सेल्फीसाठी तुम्हाला यात 10 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फोन 8GB रॅम आणि 256GB पर्यंत इंर्टनल स्टोरेज पर्यायात येतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo