Samsungने अलीकडेच आपल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Samsung Galaxy M13, Samsung Galaxy F13, Samsung Galaxy F04 आणि Samsung Galaxy M04 च्या किमती भारतात कमी करण्यात आल्या आहेत. कपातीनंतर हे सर्व स्मार्टफोन बजेट किमतीत येतात, यासह ते आता थोडे अधिक परवडणारे झाले आहेत. दरम्यान, लवकरच Amazon आणि Flipkart चे वर्षातील सर्वात मोठे सेल इव्हेंट सुरु होणार आहेत. या सेलआधीच Samsung ने आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन्सच्या किमतीत घट केली आहे. वाचा सविस्तर
Samsung Galaxy M13 आणि F13 चे बेस व्हेरिएंट भारतात 11,999 रुपयांना लॉन्च करण्यात आले होते. मात्र, आता कपातीनंतर हे दोन्ही स्मार्टफोन्स 9,199 रुपयांना खरेदी करता येणार आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स 6.6-इंच फुल HD+ LCD डिस्प्लेसह येतात. दोन्ही उपकरणे Exynos 850 प्रोसेसरने सुसज्ज आहेत. ते 6GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करतात जे मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येईल.
दोन्ही स्मार्टफोन्स 6000mAh बॅटरीसह येतात, जे 15W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेन्सर समाविष्ट केले आहेत, ज्यात 50MP प्रायमरी कॅमेरा, 5MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 2MP डेप्थ शूटर आहे. तसेच, फ्रंटला 8MP सेल्फी शूटर देण्यात आला आहे.
Samsung Galaxy M04 आणि F04 अनुक्रमे 8,499 रुपये आणि 7,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आले होते. आता कपातीनंतर Galaxy M04 आणि F04 फक्त 6,499 रुपयांना उपलब्ध आहेत. Galaxy M04 आणि F04 दोन्ही 6.5-इंच लांबीच्या HD+ LCD डिस्प्लेसह येतात. दोन्ही स्मार्टफोन्स IMG PowerVR GE8320 GPU सह पेअर केलेल्या MediaTek Helio P35 चिपसेटद्वारे समर्थित आहेत.
त्याबरोबरच, यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे, जे मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येईल. तसेच, हे स्मार्टफोन 15W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी देतात. फोनमध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय, सेल्फी घेण्यासाठी फ्रंट बाजूस 5MP सेन्सर आहे.