काही दिवसांपूर्वीच हुआवेने आपला नवीन स्मार्टफोन हुआवे मॅट 8 लाँच केला होता आणि आता ह्या स्मार्टफोनचा नवीन जेनरेशनचा स्मार्टफोन लवकरच लाँच होण्याच्या मार्गावर आहे.
काही दिवसांपूर्वीच हुआवेने आपला नवीन स्मार्टफोन हुआवे मॅट 8 लाँच केला होता आणि आता ह्या स्मार्टफोनचा नवीन जेनरेशनचा स्मार्टफोन लवकरच लाँच होण्याच्या मार्गावर आहे. ह्या स्मार्टफोनसंबंधी काही बातम्या चीनवरुन मिळत आहे, ज्यात असे म्हटले आहे की, हा किरिन 960 चिपसेटने सुसज्ज असेल. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर CPU सुद्धा असू शकते.
हा आकर्षक स्मार्टफोनमध्ये नवीन प्रोसेसरसह 20MP चा ड्यूल कॅमेरा सेटअप असणार आहे, तथापि, अलीकडेच लाँच झालेल्या हुआवे P9 आणि P9 प्लस स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेला 12MP चा कॅमेराही खूपच उत्कृष्ट होता. हेदेखील पाहा –६००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट स्मार्टफोन्स
त्याशिवाय ह्या स्मार्टफोनच्या इतर स्पेक्सविषयी अजून काही विशेष सांगण्यात आलेले नाही. मात्र अश माहिती मिळत आहे की, ह्या स्मार्टफोनला कंपनी ह्याच वर्षी लाँच करु शकते.