फ्रिडम 251 स्मार्टफोन: जगातील सर्वात स्वस्त असा स्मार्टफोन
हा स्मार्टफोन भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी रिंगिंग बेलने बनवला आहे. आणि आजपर्यंतचा सर्वात स्वस्त असा अॅनड्रॉईड 5.1 सह येणारा स्मार्टफोन असेल.
जगातील सर्वात स्वस्त असा स्मार्टफोन फ्रीडम 251 हा ५०० रुपयात नाही, तर त्याच्या मॉडल नंबर प्रमाणे केवळ २५१ रुपयात उपलब्ध होईल. ह्याचाच अर्थ ४ डॉलरच्या आसपास ह्याची किंमत आहे. ह्याचे प्री-रजिस्ट्रेशन उद्या सकाळी ६ वाजल्यापासून सुरु होईल.
स्मार्टफोनमध्ये ते सर्व मिळत आहे, जे आपल्याला ५००० पासून ७००० पर्यंत येणा-या स्मार्टफोनमध्ये मिळते. ह्या स्मार्टफोनमध्ये 4 इंचाची QHD IPS डिस्प्लेसह 1.3GHz चे क्वाड-कोर प्रोसेसर मिळणार आहे. त्याचबरोबर ह्यात फोटोग्राफीसाठी 3.2 MP चा रियर आणि 0.3MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. हा स्मार्टफोन 5.1 लॉलीपॉपवर काम करतो. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 1GB चे रॅम, 8GB चे अंतर्गत स्टोरेज ज्याला 32GB पर्यंत वाढवू शकतो.
त्याशिवाय ह्यात 1450mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे. त्याचबरोबर केवळ २५१ रुपयात आपल्याला 3G सपोर्ट करणारा एक ड्यूल सिम स्मार्टफोन मिळत आहे. कोणाचाही विश्वास बसणार नाही, अशीच ही गोष्ट आहे. पण हे खरे आहे. स्मार्टफोनसह आपल्याला 1 वर्षाची वॉरंटीसुद्धा मिळत आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल, ह्याचे सर्विस सेंटर शोधण्यास तुम्हाला खूप त्रास होईल, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ह्याची जवळपास ६५० पेक्षा जास्त सर्विस सेंटर्स आपल्याला देशभरात पाहायला मिळतील.
ह्या स्मार्टफोनची अजून एक खास गोष्ट म्हणजे, ह्या हँडसेटमध्ये वापरल्या गेलेल्या वस्तूंना आयात करुन भारतातच बनवले गेले आहे. कंपनीचा उद्देश हाच आहे की, येणा-या दिवसात अनेक आकर्षक फीचरने सुसज्ज असलेला ह्या स्मार्टफोनला भारतात पुर्णपणे विकसित करणे.
अशी माहिती मिळतेय की, डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया योजना समोर ठेवून अनेक मोबाईल निर्माता कंपन्या भारतातच स्मार्टफोनचे निर्माण करणे सुरु केले आहे. शाओमी आणि जिओनी सारख्या कंपन्या भारत सरकार ह्या प्रोजेक्टशी जुडलेले आहे.
हेदेखील वाचा – शाओमी Mi पॅड 7.9 विरुद्ध लेनोवो टॅब S8
हेदेखील वाचा – साउंड वॉलेट: र्पोट्रॉनिक्स हा पोर्टेबल ब्लूटुथ स्पीकर आहे खूपच प्रभावशाली