जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनवणारी कंपनी रिंगिंग बेल्सने आपल्या पहिल्या स्मार्टफोनला लाँच करता क्षणीच सर्वांच्या नजरेत आली होती. मात्र फ्रीडम 251 स्मार्टफोनला लाँच केल्यानंतरच दुस-या दिवसापासूनच कंपनीला जणू ग्रहणच लागले आणि तेव्हा ही कंपनी बंद झाली आहे, अशी बातमीही आली होती. मात्र सोमवारी ह्या कंपनीचे डायरेक्टर मोहित गोयल यांनी ह्याबाबत नवीन घोषणा करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्यांनी PTI वर सांगितले की, “Freedom 251 साठी ज्या लोकांनी कॅश ऑन डिलिवरी बेसिस वर ऑर्डर केला होता, त्यांना हा स्मार्टफोन 28 जूनपासून मिळणे सुरु होईल”.
कंपनीनुसार ह्या स्मार्टफोनचे जवळपास ७ करोड रजिस्ट्रेशन झाले आहेत. त्यातील ३०,००० लोकांना ह्या स्मार्टफोनच्या बुकिंगसाठी पैसे सुद्धा दिले होते.
स्मार्टफोनमध्ये ते सर्व मिळत आहे, जे आपल्याला ५००० पासून ७००० पर्यंत येणा-या स्मार्टफोनमध्ये मिळते. ह्या स्मार्टफोनमध्ये 4 इंचाची QHD IPS डिस्प्लेसह 1.3GHz चे क्वाड-कोर प्रोसेसर मिळणार आहे. त्याचबरोबर ह्यात फोटोग्राफीसाठी 3.2 MP चा रियर आणि 0.3MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. हा स्मार्टफोन 5.1 लॉलीपॉपवर काम करतो. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 1GB चे रॅम, 8GB चे अंतर्गत स्टोरेज ज्याला 32GB पर्यंत वाढवू शकतो.
हेदेखील पाहा – फ्रीडम 251 पुर्ण लाँच इव्हेंट
त्याशिवाय ह्यात 1450mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे. त्याचबरोबर केवळ २५१ रुपयात आपल्याला 3G सपोर्ट करणारा एक ड्यूल सिम स्मार्टफोन मिळत आहे. कोणाचाही विश्वास बसणार नाही, अशीच ही गोष्ट आहे. पण हे खरे आहे. स्मार्टफोनसह आपल्याला 1 वर्षाची वॉरंटीसुद्धा मिळत आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल, ह्याचे सर्विस सेंटर शोधण्यास तुम्हाला खूप त्रास होईल, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ह्याची जवळपास ६५० पेक्षा जास्त सर्विस सेंटर्स आपल्याला देशभरात पाहायला मिळतील.
त्याचबरोबर ह्या फोनमध्ये आधीपासूनच वुमन सेफ्टी, स्वच्छ भारत, मासेमारी, शेतकरी, मेडिकल, गुगल प्ले, व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि युट्युब सारखे अॅप्लिकेशन इन्स्टॉल केलेले असतील. तसेच ह्या फोनवर तुम्हाला १ वर्षाची वॉरंटीसुद्धा मिळत आहे. ह्याचे 650 पेक्षा जास्त सर्विस सेंटर्स आहेत.
हेदेखील वाचा – अखेर भारतात लाँच झाला लेनोवो वाइब K5 स्मार्टफोन, किंमत ६,९९९ रुपये
हेदेखील वाचा – 2GB रॅमने सुसज्ज आहे RDP थिन बुक लॅपटॉप लाँच, किंमत ९,९९९ रुपये