आपल्याला सर्वांनाच माहित असेल की, नोकिया कंपनी पुन्हा एकदा बाजारात दणक्यात एन्ट्री करण्यासाठी नवीन फोन्स आणि टॅबलेट बनविण्याच्या कामाला लागली आहे. त्यासाठी कंपनीने फॉक्सकॉन आणि HMD शी भागीदारी केली आहे. आणि असेही सांगितले जात आहे की, लवकरच कंपनी आपल्या नवीन अॅनड्रॉईड स्मार्टफोन्सला लाँच करु शकते.
आज समोर आलेल्या एका प्रेस रिलीजमध्ये नोकिया आपला नवीन अॅनड्रॉईड स्मार्टफोन रिव्हील केला, ज्याचे नाव आहे नोकिया P1. असे सांगितले दात आहे की, ह्या स्मार्टफोनला इनफोकस आणि शार्पच्या इंजिनियर्सनी बनवले आहे.
हेदेखील वाचा – ३००० रुपयाच्या किंमतीत येणारे भारतातील टॉप १० स्मार्टफोन्स
ह्या स्मार्टफोनचे फोटो शार्प Aquos P1 शी बरीच मिळती जुळती आहेत. त्यामुळे हा फोन नेमका शार्पचा आहे की नोकियाचा ह्याबाबत आम्ही संभ्रमावस्थेत आहोत.
ह्याआधी अशी माहिती आली होती की, नोकिया आपला पहिला अॅनड्रॉईड स्मार्टफोन नोकिया C1 बाजारात आणणार आहे. मात्र ह्या नवीन बातमीनुसार, ही शक्यताही आता संपुष्टात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता आम्हालाही उत्सुकता आहे नोकियाच्या ह्या नवीन स्मार्टफोन P1 ची. आता प्रतिक्षा आहे की नोकिया कधी ह्या स्मार्टफोनचे स्पेक्स आणि हा फोन बाजारात आणणार ह्याची???
हेदेखील वाचा- CG slate gamified लर्निंग टॅबलेट भारतात लाँच , किंमत ८,४९९ रुपये
हेदेखील वाचा- आता ४५ भाषांमध्ये ट्रान्सलेट करणार फेसबुकचे हे नवीन कंपोजर फिचर