‘LYF’ ब्रँडच्या अंतर्गत विकले जाणार रिलायन्स जियोचे 4G स्मार्टफोन्स

Updated on 19-Oct-2015
HIGHLIGHTS

ह्या 4G स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात वॉयस ओवर LTE, वॉयस ओवर वाय-फाय, HD वॉयस आणि HD क्वालिटी ही वैशिष्ट्ये आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज लवकरच भारतीय बाजारात 4G स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्याचदरम्यान अशीही बातमी मिळतेय की, रिलायन्स जियो आपल्या ह्या 4G स्मार्टफोन्सला LYF ब्रँडच्या अंतर्गत विकणार. LYF फोन देशभरात रिलायन्स रिटेल स्टोरवरसुद्धा उपलब्ध होतील आणि त्याचबरोबर इतर मल्टी-ब्रँड आऊटलेटमध्ये सुद्धा उपलब्ध होतील.

 

ह्या 4G स्मार्टफोन्सला मार्केटमध्ये आणण्याची जबाबदारी रिलायन्स रिटेलची असेल. कंपनीचे म्हणणे आहे की, हा स्मार्टफोन वापरकर्त्यांना चांगला अनुभव देईल. जर LYF ब्रँडच्या अंतर्गत विकले जाणा-या ह्या 4G स्मार्टफोन्सच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात वॉयस ओवर, वॉयस ओवर वाय-फाय, HD वॉयस आणि HD क्वालिटी ही वैशिष्ट्ये आहेत.

ह्याविषयी मुकेश अंबानी यांनी सांगितले की, आम्ही देशभरात नेटवर्क तयार करण्याचे काम ब-यापैकी पुर्ण केले आहे आणि आता आमची नेटवर्क आणि प्लेटफॉर्मची चाचणी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्याशिवाय, रिलायन्स जियो, रिलायन्स कम्युनिकेशन ७ मंडळात १८०० मेगाहटर्ज बँडमध्ये स्पेक्ट्रमची भागीदारी करेल.

ह्याआधी अशा बातम्या कानावर आल्या होत्या की, रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआईएल) २ हजार रुपयांत 4G स्मार्टफोन आणण्याच्या योजनेवर काम करत आहे. अंतर्भूत जियो अॅप असलेल्या एंन्ट्री लेवलच्या स्मार्टफोन्सची विक्री कंपनी आपला ब्रँड ’रीकनेक्ट’ च्या द्वारा रिलायन्स रिटेल नेटवर्कच्या माध्यमातून करेल. याआधी मे महिन्यात झालेल्या वार्षिक बैठकीत कंपनीने कमीत कमी ४ हजार रुपयांत 4G फोन उपलब्ध करण्याचा निर्णय घेतलाय. ह्या योजनेच्या अंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीजचा टेलिकम्युनिकेशन आर्म रिलायन्स जियो देशातील ९० करोड मोबाईल ग्राहकांमध्ये १० करोड ग्राहकांना आपले बनवण्याच्या प्रयत्नात आहेत.

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :