हा फोन स्नॅपड्रॅगन 410 क्वा़ड-कोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, तथापि, ह्या फोनमध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी काही पर्याय नाही.
रिलायन्सने आपल्या LYF सीरिजच्या अंतर्गत एक नवीन फोन LYK वॉटर 5 लाँच केला आहे. कंपनीने बाजारात आपल्या नवीन फोनची किंमत ११,६९९ रुपये ठेवली आहे आणि अॅमेझॉन इंडियावर हा विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे आणि हा VoLTE ला सपोर्ट करतो.
रिलायन्स LYF वॉटर 5 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची HD डिस्प्ले दिली आहे. हा फोन अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर काम करतो. हा फोन स्नॅपड्रॅगन 410 क्वाडकोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. हा फोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, तथापि ह्या फोनमध्ये स्टोरेजला वाढवण्याचा पर्याय नाही.
ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. हा कॅमेरा ऑटोफोकस आणि LED फ्लॅशने सुसज्ज आहे. फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. कनेक्टव्हिटीसाठी ह्या फोनमध्ये ड्यूल सिम, 4G LTE, वायफाय, ब्लूटुथ, GPS सारखे फीचर्स दिले गेले आहे.