रिलायंस जियो आपल्या यूजर्सना अकर्षक ऑफर्स आणि फ्री सर्विस इत्यादी साठी ओळखली जाते आणि आता कंपनी एक नवीन ऑफर घेऊन आली आहे. कंपनी च्या जवळपास 175 मिलियन यूजर्सना आता एक नवीन सेवा मिळणार आहे, जिचा त्यांना खुप फायदा होईल. जियो ने एका नवीन सेवेची सुरवात केली आहे जी JioPhone Match Pass नावाने ओळखली जाणार आहे. या सेवेत तुम्ही रेफर करून बक्षीस मिळवू शकता. या सेवेत जर तुम्ही 10 लोकांना जियोफोन रेफर केला तर तुम्हाला जवळपास 112GB 4G डाटा फ्री मिळणार आहे.
हा फ्री डाटा मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये फक्त 10 लोकांना जियोफोन रेफर करायचा आहे. हा डाटा तुम्हाला तेव्हा मिळेल, जेव्हा तुम्ही हा फोन आपल्या चौथ्या फ्रेंड, पाचव्या फ्रेंड, नवव्या फ्रेंड आणि दहाव्या फ्रेंड ला रेफर कराल. त्याचबरोबर दर आठवड्याला जियो कडून दोन यूजर्स निवडले जातील, ज्यांनी सर्वात जास्त फ्रेंड्सना रेफर केले असेल. या लोकांना जियोफोन रेफर केला जाईल, ज्यामुळे त्यांना जियो धन धना शो मध्ये भाग घेण्याची संधी मिळेल, जो कलर्स टीवी, MyJio/JioTV वर दाखवला जाईल.
JioPhone Match Pass: या स्कीम मध्ये तुम्हाला काय फायदे मिळत आहेत
जसे की आम्ही तुम्हाला सांगितले आहे की या सेवे अंतर्गत जियो कडून तुम्हाला 112GB 4G डाटा 56 दिवसांच्या वैधता सह फ्री मध्ये देण्यात येणार आहे. जो कुणी यूजर 10 लोकांना जियोफोन घेण्यासाठी रेफर करेल, त्यांना हा डाटा मिळणार आहे. त्याचबरोबर पाहिले चार मित्र ज्यांनी जियोफोन घेतला आहे, त्यांना रेफर करणार्या यूजरला 8GB चा डाटा पॅक दिला जाईल, जो चार दिवसांसाठी वैध असेल. तसेच यात तुम्हाला 2GB प्रतिदिन या हिशोबाने हा डाटा मिळेल.
तसेच पाचव्या मित्राने हा फोन घेतल्यास तुम्हाला 24GB वाला डाटा पॅक मिळेल, ज्याची वैधता 12 दिवसांची असेल. यात तुम्हाला 2GB प्रतिदिन ची लिमिट मिळेल. तसेच 6व्या आणि 9व्या मित्राने हा फोन घेतल्यास तुम्हाला 8GB डाटा अजून दिला जाईल, यात पण तुम्हाला 2GB प्रतिदिन ची लिमिट मिळणार आहे. आणि शेवटच्या म्हणजे 10व्या मित्राने हा फोन घेतल्यावर तुम्हाला 24GB डाटा मिळेल, ज्याची वैधता 12 दिवसांची असेल आणि या पॅक मध्ये पण तुम्हाला 2GB प्रतिदिन ची लिमिट मिळत आहे.
या पूर्ण प्रक्रिया मध्ये तुम्हाला एकूण 112GB डाटा मिळत आहे, तसेच जो व्यक्ति हा फोन विकत घेईल त्याला पण 8GB डाटा मिळेल, जो चार दिवसांसाठी वैध असेल आणि यात तुम्हाला 2GB प्रतिदिन ची लिमिट आहे.
कसे व्हाल सहभागी
या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला स्टेप्स मधून जावे लागेल. या प्रक्रियेच्या पाहिल्या टप्प्यात, ज्यांना जियोफोन विकत घ्यायचा आहे, त्यांना टोल फ्री नंबर 1800-890-8900 वर कॉल करावा लागेल. दुसर्या टप्प्यात तुम्हाला तुमचा नंबर नोंदवावा लागेल ज्यात तुम्हाला या स्कीम चा लाभ मिळणार आहे. तसेच तुम्हाला तुमच्या राहत्या जागेचा पिन कोड पण नोंदवावा लागेल.
तिसर्या टप्प्यात हा फोन विकत घेण्यासाठी तुम्हाला एका जियो रिटेलर कडे जावे लागेल, जिथून तुम्ही हा जियोफोन विकत घेणार आहात. तसेच तुम्ही jio.comवर जाऊन पण हा फोन विकत घेऊ शकता. त्यानंतर हा फोन तुमच्याकडे डिलीवर झाल्यावर तुम्हाला आणि हा फोन विकत घेणार्या यूजरला डाटा लाभ मिळेल.
ही स्कीम सुरू झाली आहे आणि 27 मे पर्यंत चालेल. आता इथे लक्षात असू दे की या डाटा चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या तारखेच्या आधी सर्व काही करावे लागेल. जर तुम्ही या तारखे नंतर काही केले तर तुम्हाला डाटा मिळणार नाही. या स्कीम मध्ये तुम्ही कितीही लोकांना रेफर करू शकता पण डाटा फक्त 112GB मिळेल.