रिलायन्स जियो लाइफ फोन फेब्रुवारीमध्ये होऊ शकतो लाँच

रिलायन्स जियो लाइफ फोन फेब्रुवारीमध्ये होऊ शकतो लाँच
HIGHLIGHTS

लाइफ अर्थ 1 स्मार्टफोनमध्ये 1.5GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615 चिपसेट आणि एड्रेनो 405 GPU ने सुसज्ज आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे. ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.

रिलायन्स जियो आपल्या लाइफ फोनला मोफत 4G डेटा आणि टॉकटाइमसह फेब्रुवारीत सादर करेल. लाइफ ब्रँडचे स्मार्टफोन कंपनीच्या सिम कार्ड आणि अनेक लाँच ऑफरसह येतील.

 

RTN.Asia ने दिलेल्या अहवालानुसार, रिलायन्स जियो आपल्या लाइफ स्मार्टफोनला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कमीत कमी १३ शहरांमध्ये लाँच करेल. रिलायन्स जियो दरम्यान कंपनीच्या सिमकार्डसह 50MB पर्यंत मोफत 4G डेटा देईल. रिलायन्स जियोच्या सिमकार्डमध्ये यूजरला कंपनीच्या नेटवर्कवर 5000 मिनिटांपर्यंत मोफत टॉकटाइम मिळेल. त्याचबरोबर ५००० मोफत एसएमएससुद्धा मिळतील.

रिलाइन्स जियोच्या लाइफ ब्रँडचे फोनची किंमत ९,९९९ पासून १८,००० रुपयांच्या दरम्यान असेल.फोनची विक्री बंगळूरु, बडोदा, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, इंदोर, जयपुर, कोच्ची, कोलकाता, मुंबई, पटना आणि पु्ण्यात केली जाईल.

अलीकडेच रिलायन्स जियोने आपल्या पहिल्या स्मार्टफोन लाइफ अर्थ 1 च्या तपशीलाची माहिती दिली होती. त्यानुसार, लाइफ अर्थ 1 स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.5GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615 चिपसेट आणि एड्रेनो 405 GPU ने सुसज्ज आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिली आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.

ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. हा अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर चालेल. त्याचबरोबर कनेक्टिव्हीटीसाठी ह्यात 4G LTE, वायफाय 802.11 B/G/N, ब्लूटथ 4.0 आणि GPS वैशिष्ट्य दिले आहे. ह्यात 3500mAh ची बॅटरीसुद्धा दिली गेली आहे.

हे पाहा- 3X ऑप्टिकल झूम लेन्ससह लाँच झाला आसूस झेनफोन झूम स्मार्टफोन

हेदेखील पाहा- पुर्ण मेटल बॉडीसह समोर आला नोकियाचा नवीन स्मार्टफोन

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo