मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स JIO ने अधिकृतपणे Kai-OS वर आधारित 4G कीपॅडसह ‘JioPhone Prima’ लाँच केला आहे. हा एक परवडणारा आणि ऍडव्हान्स फीचर फोन आहे, जो कंपनीने फक्त 2,599 रुपयांना बाजारात सादर केला आहे. या फोनची खासियत म्हणजे युजर्सना यूट्यूब, फेसबुक, WhatsApp, गुगल व्हॉईस असिस्टंट अशा अनेक सुविधांचा लाभ मिळतो. JioPhone Prima सविस्तर माहिती पुढे बघुयात.
कंपनीने हा फोन काही दिवसांपूर्वी IMC 2023 (Indian Mobile Congress) इव्हेंटमध्ये शोकेस केला होता. वर सांगितल्याप्रमाणे, आता डिव्हाइस अधिकृतपणे 2,599 रुपयांमध्ये लाँच केले गेले आहे.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोन रिटेल स्टोअर्स आणि रिलायन्स डिजिटल डॉट इन, जिओमार्ट इलेक्ट्रॉनिक्स आणि Amazon सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
JIO ने आपल्या नवीन कीपॅड स्मार्टफोनचे लूक आणि डिझाइन मोठ्या प्रमाणात आकर्षक बनवण्याचे प्रयत्न केले आहे. यामध्ये 2.4 इंच डिस्प्ले स्क्रीन उत्कृष्ट परिणाम देते. JioPhone Prima ची डिझाईन खूप बोल्ड आणि प्रीमियम आहे. हा स्मार्टफोन 1800mAh क्षमतेच्या शक्तिशाली बॅटरीसह येतो.
Jio Prima मध्ये उपलब्ध असलेल्या ऍडव्हान्स फिचरबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 23 भाषांना सपोर्ट करतो. ज्यांना 4G पॉवर, सोशल प्लॅटफॉर्मशी कनेक्ट केलेले आणि परवडणाऱ्या किमतीत शक्तिशाली मोबाइल हवे आहेत, त्यांच्यासाठी हे फोन डिझाइन केले आहे. वर सांगितल्याप्रमाणे नक्कीच यात यूट्यूब, फेसबुक, WhatsApp, गुगल व्हॉईस असिस्टंट अशा अनेक सुविधांचा लाभ मिळेल.
व्हिडिओ कॉलिंग आणि फोटोग्राफीसाठी मोबाईलच्या दोन्ही बाजूला डिजिटल कॅमेरे दिलेले आहेत. मागील भागात फ्लॅश लाइट उपलब्ध आहे. तसेच, JIO चा हा लेटेस्ट फिचर फोन Jio TV, Jio Cinema, Jio Saavn सारख्या प्रीमियम डिजिटल सेवांनी सुसज्ज आहे. तसेच, सर्वात महत्त्वाचे फिचर म्हणेज फोनमध्ये UPI पेमेंट JioPay द्वारे केले जाऊ शकते.