Reliance Jio ने फक्त Rs 199 मध्ये केला पोस्टपेड प्लान सादर
मुकेश अंबानी च्या कंपनी ने सांगितले की हा प्लान 15 मे पासून सुरू होणार्या सब्सक्रिप्शन साठी उपलब्ध होईल.
प्रीपेड ग्राहकां नंतर आता Reliance Jio, पोस्टपेड यूजर्स साठी नवीन प्लान घेऊन आली आहे. या प्लान ची किंमत 199 रूपये प्रतिमाह आहे. Jio च्या 199 रुपयांच्या प्लान मध्ये 25 GB डाटा, फ्री कॉल्स आणि Jio अॅप्स चे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे. हा प्लान इतर ऑपरेटर्स च्या तुलनेत अर्ध्या किंमतीत उपलब्ध आहे, यामुळे जुन्या पोस्टपेड नेटवर्क ऑपरेटर्सना धक्का बसू शकतो.
इतर कंपन्या देत आहेत हे प्लान्स
Airtel च्या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लान मध्ये 20 GB डाटा, अनलिमिटेड कॉल्स आणि Airtel TV तसेच Wynk म्यूजिक चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. तसेच Vodafone च्या 399 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना 20 GB डाटा, अनलिमिटेड कॉल्स आणि Vodafone प्ले सर्विसेज मिळतात. Idea पण असेच बेनेफिट्स 389 रुपयांच्या प्लान मध्ये देते. जर जुने पोस्टपेड ऑपरेटर्स Jio प्रमाणे प्लान द्यायला लागले तर प्रति यूजर पोस्टपेड एवरेज रेवेन्यु कमी होईल.
मुकेश अंबानी च्या कंपनी ने सांगितले की हा प्लान 15 मे पासून सुरू होणार्या सब्सक्रिप्शन साठी उपलब्ध होईल. कंपनी ने सांगितले, " Jioपोस्टपेड ने पोस्टपेड सेवा येण्याने आणि वापराने एक बदल दिसत आहे, जसा जियो ने आपल्या प्रीपेड सेवे मुळे केला होता."
Reliance Jio
सप्टेंबर 2016 मध्ये Jio आल्यानंतर भारतीय टेलिकॉम बाजारात टॅरिफ्स खुप कमी झाले आहेत. कंपनी ने काही महिन्यांसाठी फ्री सर्विस अंतर्गत ही सुरवात केली होती आणि त्यानंतर इतर कंपन्यांच्या तुलनेत खुप कमी किंमतीत कंपनी ने परवडणारे प्लान्स ऑफर केले. स्पर्धेत राहण्यासाठी इतर ऑपरेटर्स नी पण आपल्या प्लान्स च्या किंमती कमी करायाला सुरवात केली. मागील दोन वर्षांमध्ये Airtel चा एवरेज रेवेन्यु पर यूजर (ARPU) 70 टक्क्यांनी कमी झाला आहे. आता Jio च्या पोस्टपेड प्लान मुळे इतर टेलिकॉम ऑपरेटर्स च्या ARPU मध्ये पण घट बघायला मिळू शकते.