Absolutely Lowest! Reliance Jio घेऊन येतेय सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, 2G आणि 3G ची झाली सुट्टी? Tech News
Reliance Jio लवकरच एक 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे.
आगामी 5G Jio स्मार्टफोन 10 हजार रुपयांच्या आत असणार आहे.
Qualcomm ने Reliance Jio सोबत भागीदारी केली आहे.
Reliance Jio लवकरच एक 5G स्मार्टफोन लाँच करणार अशा चर्चा भारतीय टेक विश्वात रंगल्या आहेत. कंपनीचा आगामी 5G Jio स्मार्टफोन 10 हजार रुपयांच्या आत असणार आहे, असे म्हटले आजच्या आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Qualcomm ने जगप्रसिद्ध कंपनी म्हणजेच Reliance Jio सोबत भागीदारी केली आहे. यासह देशात लवकरच स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच होणार आहे.
2G आणि 3G ची होणार सुट्टी?
वर सांगितल्याप्रमाणे, आगामी 5G Jio स्मार्टफोन किंमत 10 हजार रुपयांच्या आत असू शकते. देशातून 2G पूर्णपणे काढून टाकून 5G कडे वाटचाल करायची असल्याने हे पाऊल उचलले जात आहे. याशिवाय, ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, असे सांगितले जात आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, Qualcomm सोबत झालेल्या या भागीदारीतून असे समजते की, रिलायन्स Jio चा नवीनतम 5G स्मार्टफोन अर्थातच Qualcomm च्या प्रोसेसरसह लॉन्च केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमुळे ग्राहकांना कमी किमतीत सर्वोत्तम 5G अनुभव मिळणार आहे, अशी माहिती ताज्या अहवालातून पुढे आलेली आहे.
Hanooman AI Model
प्रसिद्ध AI मॉडेल ChatGPT शी स्पर्धा करण्यासाठी Reliance कंपनी BharatGPT विकसित करत आहे. कंपनी या अंतर्गत आपले पहिले AI मॉडेल आणणार आहे, जे ‘Hanooman’ नावाने सादर केले जाईल. हे मॉडेल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठांच्या पार्टनरशिपमध्ये तयार केले जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, मागील वर्षी Reliance Jio इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी यांनी एका कार्यक्रमादरम्यान माहिती दिली होती की, कंपनी नवीन AI मॉडेल आणण्यासाठी IIT बॉम्बेसोबत काम करत आहे. त्याबरोबरच, कंपनी पुढील महिन्यात आपले पहिले AI मॉडेल सादर करण्यासाठी सज्ज होत आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile