4G फीचर फोन्स मधील युद्ध: चला जाणून घेऊया रिलायंस जियो 2 आणि Nokia 8110 4G मधील फरक

4G फीचर फोन्स मधील युद्ध: चला जाणून घेऊया रिलायंस जियो 2 आणि Nokia 8110 4G मधील फरक
HIGHLIGHTS

रिलायंस जियो ने आपल्या प्रसिद्द फीचर फोन ची आता दुसरी जेनेरेशन म्हणजे जियोफोन 2 लॉन्च केला आहे. पण आज आम्ही Nokia 8110 4G आणि JioPhone 2 मधील काही मोठे फरक इथे सांगणार आहोत.

रिलायंस जियो ने आपल्या प्रसिद्द फीचर फोन ची आता दुसरी जेनेरेशन म्हणजे जियोफोन 2 लॉन्च केला आहे. पण आज आम्ही Nokia 8110 4G आणि JioPhone 2 मधील काही मोठे फरक इथे सांगणार आहोत. एकीकडे जियोफोन एका नवीन अपग्रेडेड QWERTY Keypad सह लॉन्च करण्यात आला आहे आणि हा डिवाइस दिसायला ब्लॅकबेरी डिवाइस सारखाच वाटतो. पण हार्डवेयर इत्यादी मध्ये जास्त बदल करण्यात आले नाहीत. असे बोलले जात आहे की या डिवाइस मध्ये तुम्हाला लवकरच व्हाट्सॅप मिळेल. दुसरीकडे Nokia ने आपला नवीन फीचर फोन Nokia 8110 4G एका प्रसिद्द नावाने म्हणजे बनाना फोन या नावाने लॉन्च केला आहे. वर वर पाहता या दोन्ही फोन्स मध्ये एक सारखेच फीचर्स तुम्हाला मिळतील. पण आज आम्ही या दोन्ही मधील फरक सविस्तर सांगणार आहोत. 

जियोफोन 2 आणि नोकिया 8110 4G ची डिजाईन आणि डिस्प्ले
जर जियोफोन 2 च्या डिजाईन इत्यादी बद्दल बोलायचे झाले तर नोकिया च्या 8110 4G म्हणजे बनाना फोन आणि याच्यात भरपूर अंतर आहे. कारण JioPhone 2 मध्ये तुम्हाला एक QWERTY म्हणजे ब्लॅकबेरी सारखी डिजाईन मिळत आहे, जी एका 2.4-इंचाच्या हॉरिजॉन्टल स्क्रीन सोबत येते. तर Nokia च्या बनाना फोन मध्ये तुम्हाला एक बनाना सारखी डिजाईन मिळत आहे. तसेच यात तुम्हाला एक स्लाइडर पण मिळेल, ज्याने Keypad कवर होतो. यात एक T9 KeyPad ahe, जो 2.4-इंचाच्या एका वर्टीकल स्क्रीन खाली आहे. 

जियोफोन 2 आणि नोकिया 8110 4G हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर 
सॉफ्टवेयर बद्दल बोलायचे झाले तर दोन्ही फोन्स मध्ये आपल्याला KaiOS दिसेल, तसेच लक्षात असू द्या कि Nokia 8110 4G फोन स्नॅपड्रॅगन 205 वर चालतो. तर JioPhone मधील चिपसेट बद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. दोन्ही फोन्स मध्ये तुम्हाला ड्यूल सिम ऑप्शन मिळत आहे. एक नॅनो सिम साठी आहे आणि दुसरा यात माइक्रोएसडी कार्ड साठी देण्यात आला आहे. रॅम इत्यादी बद्दल बोलायचे झाले तर दोन्ही डिवाइस मध्ये 512MB की रॅम सोबत 4GB ची इंटरनल स्टोरेज आहे. ही स्टोरेज तुम्ही माइक्रोएसडी कार्ड च्या मदतीने वाढवू शकता. 

जियोफोन 2 आणि नोकिया 8110 4G कॅमेरा 
कॅमेरा इत्यादि पाहता दोन्ही फोन्स मध्ये तुम्हाला 2-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा मिळत आहे, पण नोकिया च्या फोन मध्ये तुम्हाला सेल्फी कॅमेरा मिळत नाही, तर जियोफोन 2 मध्ये तुम्हाला वीजीए सेल्फी कॅमेरा मिळेल. एकीकडे जियोफोन मध्ये तुम्हाला एक 2,000mAh क्षमता असलेली बॅटरी मिळेल, तर दुसरीकडे Nokia 8110 4G फोन मध्ये तुम्हाला एक 1500mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे

जियोफोन 2 आणि नोकिया 8110 4G ची किंमत 
जियोफोन 2 ची किंमत Rs 2,999 आहे आणि हा डिवाइस 15 ऑगस्ट पासून सेल साठी आला आहे. तसेच Nokia 8110 4G बद्दल बोलायचे झाले तर हा भारतीय बाजारात Q3 च्या आसपास येऊ शकतो. या डिवाइस ची किंमत पाहता हा EUR 79 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, भारतीय रुपयांमध्ये ही किंमत जवळपास Rs 6,300 होईल, तसेच हा SGD 98 म्हणजे Rs 4,900 मध्ये पण लॉन्च करण्यात आला आहे. तर हा सिंगापुर मध्ये, GBP 78.56 म्हणजे जवळपास Rs 7,040 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo