Reliance Jio आपल्या पोर्टफोलिओमध्ये स्वस्त ते एक्सपेन्सिव्ह या किंमत श्रेणीमध्ये अनेक प्लॅन्स ऑफर करते. Jio आपल्या युजर्सना नाममात्र किमतीत आपल्या प्लॅनसह अनेक लाभ ऑफर करते. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Jio च्या अशाच एका प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. या प्लॅनमध्ये दररोज भरपूर डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि अतिरिक्त लाभ देखील उपलब्ध आहेत. जाणून घेऊयात Jio च्या सर्वात स्वस्त प्लॅनचे संपूर्ण तपशील.
कंपनीच्या कथित प्लॅनची किंमत फक्त 219 रुपयांचा आहे, जो दैनंदिन आधारावर 3GB डेटासह अमर्यादित कॉलिंग देखील देतो. या प्लॅनमध्ये कंपनीने अतिरिक्त डेटा देखील दिला आहे, ज्यामुळे तुम्हाला 2GB चा फायदा मिळतो. प्लॅनमध्ये 14 दिवसांची वैधता मिळेल. वैधतेदरम्यान, या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 44GB डेटाचा लाभ घेता येणार आहे. एवढेच नाही तर, या प्लॅनसह कंपनी दररोज 100 मोफत SMS देखील देत आहे.
हा प्लॅन तुम्हाला JioTV, JioCinema, JioCloud सारख्या ऍप्सचे सबस्क्रिप्शन देखील देतो. तुम्ही JioTV वर अनेक प्रकारचे टीव्ही कार्यक्रम पाहू शकता. याशिवाय, तुम्हाला प्लॅनमध्ये JioCloud सेवा मिळते, जी कमी इंटर्नल स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनमध्ये खूप उपयुक्त आहे. हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट MyJio ऍपवरून किंवा जवळच्या JIO रिटेलरकडून 219 रुपयांमध्ये सक्रिय केला जाऊ शकतो.
युजर्सच्या मनोरंजनासाठी जिओने एक विशेष सोय देखील या प्लॅनसह केली आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला JioCinema चे सबस्क्रिप्शन देखील दिले जाते, जेणेकरून तुम्ही तुमच्या मोबाईलवर चित्रपट, टीव्ही शो, क्रिकेट मॅचेस इ. चा आनंद घेऊ शकता.
सध्या जवळपास प्रत्येकाच्या घरी Wi-Fi ची सुविधा आहे. जर तुम्हाला एखादे वेळी बाहेर किंवा काही दिवसांच्या ट्रीपला जायचे असेल आणि तुम्हाला जास्त डेटाची गरज पडणार आहे. अशा परिस्थितीत तुम्ही हा प्लॅन रिचार्ज करू शकता. वैधता आणि बेनिफिट्स बघता या किमतीसह Jio चा हा प्लॅन अगदी योग्य आहे.