Reliance AGM 2023: जिओ होम, जिओ क्लाउड PC आणि AirFiber सह अनेक मोठ्या घोषणा, वाचा डिटेल्स

Updated on 28-Aug-2023
HIGHLIGHTS

Reliance AGM 2023 मध्ये कंपनीने केलेल्या मोठ्या घोषणांबद्दल जाणून घेऊयात.

जिओ ही जगातील पहिली टेलिकॉम ऑपरेटर आहे, ज्यांनी स्वतंत्रपणे 5G सेवा सुरू केली आहे.

लॅपटॉपसाठी कंपनी Google आणि HP सह हातमिळवणी करणार आहे.

Reliance इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 46 व्या AGM मध्ये Jio AirFiber हायस्पीड 5G ब्रॉडबँड, Jio Home ऍपसह अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. कंपनी लवकरच Jio Cloud PC लाँच करणार आहे. रिलायन्स AGM 2023 मध्ये, जिओ स्मार्ट होम सेवेची घोषणा करताना, कंपनीने म्हटले आहे की पुढील तीन वर्षांत कंपनी 200 दशलक्ष म्हणजेच वापरकर्त्यांना Jio AirFiber द्वारे सर्व्हिस देईल. Reliance AGM 2023 मध्ये कंपनीने केलेल्या मोठ्या घोषणांबद्दल जाणून घेऊयात. 

फास्ट 5G रोल आउट

जिओ ही जगातील पहिली टेलिकॉम ऑपरेटर आहे ज्याने स्वतंत्रपणे 5G सेवा सुरू केली आहे. Jio True 5G बद्दल, मुकेश अंबानी म्हणाले की, देशात 450 कोटीपेक्षा जास्त जिओ वापरकर्ते आहेत. एक Jio वापरकर्ता दरमहा सरासरी 25GB डेटा वापरतो. Jio डिसेंबर 2023 पर्यंत देशातील प्रत्येक शहर आणि गावात 5G कव्हरेज वाढवेल. मुकेश अंबानी यांनी दावा केला आहे की Jio True 5G ही जगातील सर्वात वेगवान 5G सेवा आहे. 

Jio AirFiber

Jio ने गेल्या वर्षी आपली 5G वायरलेस ब्रॉडबँड सेवा Jio AirFiber जाहीर केली होती. येत्या गणेश चतुर्थीला म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी ही सेवा सुरू करणार आहे. वापरकर्ते जिओ AirFiber आणि जिओ फायबर कनेक्शनसाठी My Jio APP किंवा जिओच्या वेबसाइटवर त्यांचा पत्ता टाकून अर्ज करू शकतात. वापरकर्त्यांना घरी बसून 5G राउटर वितरित केले जाणार आहे.

Jio Cloud PC

रिलायन्स Jio दुसऱ्या लॅपटॉपवरही काम करत आहे. या लॅपटॉपसाठी कंपनी Google आणि HP सह हातमिळवणी करणार आहे. Jio हा लॅपटॉप पुढच्या वर्षी लाँच करेल, अशी अपेक्षा आहे. जिओच्या इतर उपकरणांप्रमाणे हे देखील स्वस्तात लाँच केले जाऊ शकते. 

Jio Home App

रिलायन्स जिओने स्मार्ट होम इकोसिस्टमसाठी नवीन Jio Home App लाँच केले आहे. या ऍपद्वारे वापरकर्ते त्यांच्या घरातील सर्व स्मार्ट उपकरणे कनेक्ट करू शकतील. विशेषतः हे ऍप AI फीचर्ससह सुसज्ज असेल. याशिवाय हे ऍप जिओ होम सेट टॉप बॉक्ससाठी रिमोट म्हणूनही वापरले जाऊ शकते. डिजिटल सुरक्षेसाठीही हे ऍप वापरता येईल. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :