सध्या भारतीय टेक बाजारात आगामी Realme 13 Pro 5G आणि Realme 13 Pro+ 5G फोनच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु आहे. हे दोन्ही स्मार्टफोन भारतात 30 जुलै रोजी लाँच केले जातील. हे स्मार्टफोन बाजारात येण्यापूर्वी 4,500 रुपयांपेक्षा जास्त सूट देऊन Realme 12 Pro 5G फोन खरेदी करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे ही सवलत तुम्हाला थेट मिळणार आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही बँक कार्ड किंवा कूपन कोड वापरण्याची गरज नाही. पाहुयात स्वस्त किमतीत Realme 12 Pro 5G स्मार्टफोन कुठून खरेदी करता येईल.
Also Read: HMD Crest मोबाईलची भारतीय लाँच डेट कन्फर्म! मिळेल आकर्षक फोटोग्राफीचा अप्रतिम अनुभव
लेटेस्ट Realme 12 Pro 5G फोन ई-कॉमर्स साइट Amazon वर स्वस्त किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंट, जो 25,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. मात्र, साईटवर हा स्मार्टफोन केवळ 21,990 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. येथून खरेदी करा
तर, दुसरीकडे या फोनचा 8GB + 256GB व्हेरिएंट येथे थेट 22,494 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा व्हेरिएंट 26,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनच्या दोन्ही मॉडेल्सची किंमत 4,000 रुपयांनी कमी झाली आहेत. येथून खरेदी करा
Realme 12 Pro 5G फोनच्या 6.7-इंच लांबीचा फुल HD+ पंच-होल डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. ही एक कर्व OLED स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटच्या सपोर्टसह येते. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
हा स्मार्टफोन, फोटोग्राफीसाठी Realme 12 Pro 5G ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यामध्ये OIS टेक्नॉलॉजीसह 50MP चा Sony IMX882 मुख्य सेन्सर आहे. तसेच, यात 32MP IMX709 टेलिफोटो लेन्स आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सरच्या संयोगाने कार्य करतो. त्याबरोबरच, यात सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.