Redmi बनेल एक वेगळा ब्रँड, Xiaomi च्या CEO ने केले स्पष्ट

Updated on 04-Jan-2019
HIGHLIGHTS

Xiaomi नुसार ब्रँड वेगळा करून Mi ब्रँड वर जास्त लक्ष केंद्रित केले जाईल आणि त्यानंतर कंपनीकडे तीन ब्रँड्स, रेड्मी, पोको आणि मी असतील.

महत्वाचे मुद्दे

  • शाओमी आणि रेड्मी आता होतील वेगवगेळे ब्रँड्स
  • शाओमीच्या CEO ने सांगितले कि आता संपूर्ण लक्ष मी ब्रँड वर केंद्रित केले जाईल
  • शाओमीचे आता आशेत तीन ब्रँड्स मी, रेड्मी आणि पोको

 

टेक इंडस्ट्री मध्ये आपण कंपन्यां वेगळ्या होताना पहिले आहे आणि एक ताजा किस्सा म्हणजे वनप्लस आधी ओप्पो पासून वेगळा झाला आणि एक नवीन कंपनी बनून समोर आला, त्याचप्रमाणे ओप्पो पासून बाजूला होऊन रियलमी एक नवीन ब्रँड बनला आहे. आता अशा अफवा येत होत्या कि रेड्मीला Xiaomi पासून बाजूला करून एक नवीन ब्रँड बनवला जाईल आणि त्याचवेळी कंपनी ने घोषणा पण केली कि 10 जानेवारीला कंपनी एक स्मार्टफोन लॉन्च करेल. Xiaomi चे CEO Lei Jun यांनी पण याची पुष्टि केली आहे.

GizmoChina नुसार, एक एग्जीक्यूटिव ने सांगितले कि नवीन ब्रँड तयार करून कंपनी संपूर्ण लक्ष मी ब्रँड फोन्स वर केंद्रित करेल आणि या सेगमेंटचे फोन्स वाढवले जातील. आता शाओमी कडे तीन ब्रँड्स होतील, रेड्मी बजेट फोन्स वर काम करेल, तर पोको किफायती प्रीमियम फोन्स वर लक्ष केंद्रित करेल तसेच मी ब्रँड प्रीमियम फोन्स वर फोकस करेल. रेड्मी डिवाइसेज कंपनी ऑनलाइन प्लॅटफार्म वर विकते तर मी फोन्स ऑफलाइन-सेंट्रिक फोन असतात.

शाओमी ने अशी पण घोषणा केली आहे कि 10 जानेवारीला कंपनी 48MP रियर कॅमेरा असलेला Redmi स्मार्टफोन लॉन्च करेल जो पंच होल कॅमेऱ्यासह येऊ शकतो. कंपनी कोणता फोन लॉन्च करेल हा अजूनही स्पष्ट झाले नाही पण मागील रिपोर्ट मधून संकेत मिळाले आहेत कि Xiaomi Redmi Pro 2 किंवा Redmi 7 लॉन्च केला जाऊ शकतो. मागील रिपोर्टनुसार, 48MP सेंसर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपचा भाग असेल .

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :