Redmi ने अलीकडेच आपल्या Redmi Note 10S स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने या फोनची किंमत 2000 रुपयांनी कमी केली होती. कपात व्यतिरिक्त, आता हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आणखी स्वस्त खरेदी करता येईल. या फोनमध्ये एकूण पाच कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यामध्ये चार मागील आणि सिंगल फ्रंट कॅमेराचा समावेश आहे. याशिवाय 5000mAh ची बॅटरी आणि 512GB एक्सपेंटेबल स्टोरेज सारखे फीचर्स आहेत.
हे सुद्धा वाचा : Koffee With Karan 7 Release Date : ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत करणने सांगितली शोच्या नव्या सिझनची तारीख
Redmi Note 10S स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये येतो. त्याच्या बेस मॉडेलमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मिळेल. फोनची किंमत एकूण 16,999 रुपये आहे, परंतु किंमत कमी झाल्यानंतर फोन आता 12,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना फ्लिपकार्टवर 1,250 रुपयांची झटपट सूट + 500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. अशाप्रकारे, तुम्हाला हा फोन एकूण 5,750 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 11,249 रुपयांना मिळेल. येथून खरेदी करा…
Redmi Note 10S स्मार्टफोनमध्ये 6.42-इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. यात MediaTek Helio G95 प्रोसेसर आणि हायपर इंजिन गेम टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. फोनमध्ये 8 GB पर्यंत RAM, 128 GB पर्यंत स्टोरेज आहे. मायक्रो SD कार्डद्वारे स्टोरेज 512 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक आहे.
फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड सेन्सर, 2MP + 2MP चे दोन सेन्सर समाविष्ट आहेत. सेल्फीसाठी 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.