Xiaomi चा पॉवरफुल टॅबलेट लवकरच होणार लाँच! Redmi Pad Pro 5G ‘या’ दिवशी होणार दाखल

Updated on 23-Jul-2024
HIGHLIGHTS

Redmi चा नवा टॅबलेट Redmi Pad Pro 5G च्या भारतीय लाँचची घोषणा

Redmi ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत दिली माहिती

नवा टॅबलेट या महिन्याच्या शेवटी भारतीय बाजारात लाँच होणार आहे.

Xiaomi आपले नवीन प्रोडक्ट भारतात लाँच करणार आहे. होय, Redmi चा नवा टॅबलेट Redmi Pad Pro 5G च्या भारतीय लाँचची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने पुष्टी केली आहे की, नवा टॅबलेट या महिन्याच्या शेवटी भारतीय बाजारात लाँच होणार आहे. कंपनीने जागतिक बाजारपेठेत या टॅबलेटची फीचर्स उघड केली आहेत. या टॅबलेटमध्ये मोठी स्क्रीन, पॉवरफुल प्रोसेसर आणि अनेक चांगले फीचर्स उपलब्ध आहेत. जाणून घेऊयात Redmi Pad Pro 5G चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-

Also Read: आकर्षक आणि लोकप्रिय iPhone 15 भारी Discount सह खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या बेस्ट ऑफर

Redmi Pad Pro 5G चे भारतीय लॉन्चिंग

Redmi ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत, Redmi Pad Pro 5G च्या भारतीय लाँच डेटबद्दल खुलासा केला आहे. हा नवा टॅबलेट जुलै महिन्याच्या शेवटी म्हणजेच 29 जुलै रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. तुम्ही खालील पोस्टमध्ये आगामी टॅबलेटबद्दल माहिती बघू शकता.

Redmi Pad Pro 5G चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

Redmi Pad Pro 5G मध्ये 12.1-इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz AdaptiveSync रिफ्रेश रेटसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Snapdragon 7s Gen 2 चिपसेट वापरण्यात येईल. यासोबतच, स्टोरेज सेक्शनमध्ये या फोनसह 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिले जाईल. ताज्या लीकनुसार, या टॅबलेटमध्ये 1.5TB पर्यंतचे मायक्रो SD कार्ड इन्स्टॉल केले जाऊ शकते.

फोटोग्राफीसाठी, 8MP रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये फक्त 8MP फ्रंट कॅमेरा दिला जाईल. या टॅबलेटमध्ये 10,000mAh बॅटरी आणि 33W वायर चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. बॅटरी बॅकअपबद्दल, कंपनीचा दावा आहे की, ते एका पूर्ण चार्जवर 12 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक टाइम प्रदान करेल. लक्षात घ्या की, भारतात लाँच होणाऱ्या टॅबलेटचे फीचर्स ग्लोबल व्हेरियंटसारखे असतील की, ते बदलले जातील याची कंपनीने अद्याप पुष्टी केलेली नाही.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :