शाओमी ने चीन मध्ये आपला Redmi Note 7 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कंपनी ने रेडमी ब्रँड अंतर्गत लॉन्च केला आहे. गेल्या आठवड्यात Xiaomi चे CEO Lei Jun यांनी घोषणा केली होती कि रेडमी एक वेगळा ब्रँड बनवला जाईल. कंपनी ने हा स्मार्टफोन Xiaomi Redmi Note 7 ऐवजी Redmi Note 7 नावाने सादर केला आहे. यानंतर शाओमीचे तीन ब्रँड्स रेड्मी, मी आणि पोको झाले आहेत.
Redmi Note 7 बद्दल बोलायचे तर या स्मार्टफोनचा 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंट CNY 999 (जवळपास Rs 10,000) मध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच, Redmi Note 7 चा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट CNY 1,199 (जवळपास Rs 12,000) तर 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट CNY 1,399 (जवळपास Rs 14,000) मध्ये लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन 15 जानेवारी पासून चीन मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
नवीन Redmi Note 7 स्मार्टफोन कॅमेरा, नवी डिजाइन आणि आता अनेक खास स्पेक्स सह Redmi Note 6 Pro ला टक्कर देतो. हे रेडमी नोट 7 चे टॉप 5 फीचर्स आहेत.
Redmi Note 7 ची सर्वात मोठी खासियत याचा 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या स्मार्टफोन मध्ये 48 आणि 5 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. हा रेडमीचा असा पहिला फोन आहे जो RMB 999 (जवळपास Rs 10,000) मध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा ऑफर करत आहे. शाओमी ने सॅमसंग ICOSELL ब्राइट GM1 सह 48 मेगापिक्सलचा कॅमेरा सादर केला आहे. तसेच यात PDAF, HDR, EIS, 1080p विडियो रिकॉर्डिंग आणि सुपर नाईट सीन मोड पण देण्यात आला आहे.
डिस्प्ले बद्दल बोलायचे तर Redmi Note 7 मध्ये देण्यात आलेला डिस्प्ले Redmi Note 6 Pro पेक्षा वेगळा आहे. या डिस्प्ले मध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच देण्यात आली आहे. अशाप्रकारचा डिस्प्ले Oppo, Vivo, Realme, Honor इत्यादींच्या स्मार्टफोन्स मध्ये दिसला आहे.
Redmi Note 7 मध्ये 4,000mAh की बॅटरी देण्यात आली आहे, जी जवळपास रेडमीच्या सर्व फोन्स मध्ये सारखीच आहे पण या फोन मध्ये देण्यात आलेली बॅटरी क्विक चार्ज 4 ला सपोर्ट करते. शाओमीचा दावा आहे कि फोन 1 तास 43 मिनिटांत 0 पासून 100 टक्क्यांपर्यंत चार्ज केला जाऊ शकतो.
Redmi Note 7 ला मेटल ऐवजी ग्लास डिजाइन देण्यात आली आहे. डिवाइसच्या मागे 2.5D कर्व्ड ग्लास देण्यात आली आहे आणि हि तीन ग्रेडिएंट कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. शाओमीची Redmi लाइनअप बऱ्याचदा एकाच रंगात दिसली आहे पण Redmi Note 7 ग्रेडिएंट ट्वीलाइट गोल्ड, फँटसी ब्लू आणि ब्राइट ब्लॅक रंगांत लॉन्च केला गेला आहे.
Redmi Note 7 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा पूर्णपणे एक नवीन प्रोसेसर नाही पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 पेक्षा अपग्रेडड प्रोसेसर आहे.
नवा Redmi Note 7 USB टाइप-C पोर्ट सह येतो जो Xiaomi Redmi Note 6 Pro च्या तुलनेत एक चांगला अपग्रेड आहे. आपण रेडमी फोन्स मध्ये माइक्रो-USB पोर्ट बघितला आहे पण या फोन मध्ये USB टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.