शाओमीचा फ्लॅगशिप फोन Redmi Note 7 चीनी मार्केट मध्ये याच महिन्यात म्हणजे 2019 मध्ये यूजर्स साठी सादर केला गेला होता. विशेष म्हणजे या फोनची खासियत ज्यामुळे हा फोन चर्चेत राहिला आहे ती म्हणजे यात 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन लवकरच भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो आणि यासाठी आधीपण बातमी आली आहे. आता अजून एक बातमी समोर आली आहे कि आता Redmi Note 7 चा ग्लोबल वेरिएंट लवकरच भारतात कंपनी लॉन्च करणार आहे.
Xiaomi ग्लोबल चे प्रवक्ता Donovan Sung ने एक फोटो ट्वीट केला आहे जो Redmi Note 7 चा ग्लोबल वेरिएंट लवकरच लॉन्च केला जाण्याकडे इशारा करत आहे. Redmi Note 7 डिवाइस मध्ये यूजर्सना 4,000 एमएएच बॅटरी, 2.5D ग्लास प्रोटेक्शन आणि 6.3 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो.
https://twitter.com/donovansung/status/1090092688714526721?ref_src=twsrc%5Etfw
ट्वीट मध्ये लिहिण्यात आले आहे, 'Redmi Note 7. Stay Tuned' ज्यावरून स्पष्टपणे समजत आहे कि रेडमी नोट 7 चा ग्लोबल वेरिएंट लवकरच येणार आहे. अलीकडेच शाओमीचे इंडिया हेड Manu Kumar Jain यांनी रेडमी नोट 7 भारतात आणण्याचा टीजर शेअर केला होता. किंमतीबद्दल बोलायचे तर चीनी मार्केट मध्ये शाओमी रेडमी नोट 7 ची किंमत 999 चीनी युआन म्हणजे जवळपास 10,300 रुपये आहे ज्यात यूजर्सना 3 जीबी रॅम/32 जीबी स्टोरेज वेरिएंट मिळेल. तसेच 4 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,199 चीनी युआन म्हणजे जवळपास 12,400 रुपये आहे. Xiaomi Redmi Note 7 च्या प्रीमियम वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज आहे आणि याची किंमत 1,399 चीनी युआन म्हणजे जवळपास 14,500 रुपये सांगण्यात आली आहे.
ड्यूल सिम सह Redmi Note 7 मीयूआई 9 वर आधारित एंड्रॉयड ओरियो वर चालेल. यात 6.3 इंचाचा फुल एचडी+ (1080×2340 पिक्सल) एलटीपीएस डिस्प्ले आहे ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. स्क्रीन प्रोटेक्शन साठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 आणि 2.5 डी कर्व्ड ग्लास चा वापर झाला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी 2.2 गीगाहर्ट्ज स्नॅपड्रॅगॉन 660 ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 3 जीबी, 4 जीबी आणि 6 जीबी रॅम मिळेल. फोन मध्ये 32 जीबी आणि 64 जीबी स्टोरेज आहे.
कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर Redmi Note 7 मध्ये दोन रियर कॅमेरा आहेत. एलईडी फ्लॅश सह 48 मेगाापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर आहे ज्याचा अर्पचर एफ/1.8 आणि सेकेंडरी कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे. सेल्फी साठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये 4,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी क्विक चार्ज 4 सपोर्ट सह येते. कनेक्टिविटी साठी यूएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5 मिलीमीटर ऑडियो जॅक, 4 जी वीओएलटीई, ब्लूटूथ आणि वाई-फाई सपोर्टचा समावेश केला गेला आहे.