28 नोव्हेंबरला Redmi Note 6 Pro विकत घेण्याची अजून एक संधी

28 नोव्हेंबरला Redmi Note 6 Pro विकत घेण्याची अजून एक संधी
HIGHLIGHTS

नुकत्याच झालेल्या Redmi Note 6 Pro च्या सेल मध्ये कंपनी ने हा स्मार्टफोन लॉन्च ऑफर अंतर्गत 12,999 रुपयांमध्ये उपलब्ध केला होता आणि सोबत अनेक ऑफर्स पण दिल्या होत्या. पुन्हा एकदा कंपनी हा डिवाइस सेल साठी घेऊन येणार आहे.

शाओमी ने आपल्या लेटेस्ट Redmi Note 6 Pro भारतात 22 नोव्हेंबरला लॉन्च केल्यानंतर फ्लिपकार्टच्या Black Friday Sale आणि मी डॉट कॉम सेल वर उपलब्ध केला होता. कंपनी ने डिवाइस वर 1,000 रुपयांची सूट देत हा फक्त 12,999 रुपयांमध्ये यूजर्स साठी उपलब्ध केला होता. जर तुम्ही या सुवर्णसंधीचा फायदा घेऊ शकला नसाल तर तुमच्याकडे अजून एक संधी आहे. हो, कंपनी पुन्हा एकदा हा डिवाइस फ्लिपकार्ट सेल साठी उपलब्द करणार आहे. हा सेल 28 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता मी डॉट कॉम आणि फ्लिपकार्ट वर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनी ने ट्विटर पोस्ट मधून असा दावा केला आहे कि पहिल्या सेल मध्ये 600,000 रेडमी नोट 6 प्रो ची विक्री झाली आहे. आता जवळपास सर्व ऑनलाइन स्टोर वर हा डिवाइस ‘लवकरच येत आहे’ सह लिस्ट करण्यात आला आहे.

Redmi Note 6 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Xiaomi Redmi Note 6 Pro एंड्रॉयड 8.1 ओरियो वर आधारित मीयूआई 10 वर चालतो. यात 6.26 इंचाचा फुल-एचडी+ आईपीएस एलसीडी फुल स्क्रीन पॅनल आहे. 19:9 आस्पेक्ट रेश्यो सह यात 86% स्क्रीन टू बॉडी रेश्यो देण्यात आला आहे. स्मार्टफोन मध्ये 14एनएम ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 636 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबत स्क्रीन प्रोटेक्शन साठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास आहे.

 

ग्राफिक्स साठी एड्रेनो 509 जीपीयू इंटिग्रेटेड आहे. कॅमेरा सेट-अप पाहतात Xiaomi Redmi Note 6 Pro च्या बॅक पॅनल वर ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्राइमरी सेंसर 12 मेगापिक्सलचा आहे आणि सेकेंडरी 5 मेगापिक्सल सेंसर सह येतो. या डिवाइसचा रियर कॅमेरा ड्यूल पिक्सल ऑटोफोकस, 1.4 माइक्रोन पिक्सल्स आणि एआई पोर्ट्रेट 2.0 सह येतो. इतकेच नव्हे, स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनल वर पण दोन कॅमेरा देण्यात आले आहेत ज्यात प्राइमरी सेंसर 20 मेगापिक्सल आणि सेकेंडरी सेंसर 2 मेगापिक्सलचा आहे.

कनेक्टिविटी फीचर मध्ये यूजर्सना 4जी वीओएलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, माइक्रो-यूएसबी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक मिळत आहेत. एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, इलेक्ट्रॉनिक कंपास, जायरोस्कोप, आईआर ब्लास्टर, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि फिंगरप्रिंट सेंसर पण या फोन मध्ये आहेत. फोनची बॅटरी 4000 एमएएच ची आहे आणि हा क्वालकॉम क्विक चार्ज 3.0 ला सपोर्ट करतो.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo