Xiaomi Redmi Note 5 आणि Redmi Note 5 Pro स्मार्टफोन भारतात एकदा पुन्हा 28 मार्चला सेल साठी होतील उपलब्ध. याआधी झालेल्या सेल मध्ये या स्मार्टफोंसना खुप यश मिळाले होते, काही सेकेंड्स मध्ये फोंस चा स्टॉक संपला होता. आता दोन्ही फोंस 28 मार्चला दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट आणि Mi.com वर एकदा पुन्हा सेल साठी उपलब्ध होतील.
विशेष म्हणजे फ्लॅश सेल मध्ये तुम्ही फ्लिपकार्ट वरून कॅश ऑन डिलीवरी ने पण हे डिवाइस ऑर्डर करू शकता, पण शाओमी आपल्या अधिकृत वेबसाइट वर रिसेलिंग ला थांबवण्यासाठी कॅश ऑन डिलीवरी चा ऑप्शन दिला जात नाही.
हि गोष्ट लक्षात ठेवा की 28 मार्चला Flipkart आणि शाओमी च्या अधिकृत वेबसाइट वर सुरू होणारा सेल एक फ्लॅश सेल आहे, ज्याचा अर्थ असा आहे की हे दोन्ही डिवाइस काही सेकेंड मधेच आउट ऑफ स्टॉक होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही महीना संपण्याआधी Redmi Note 5 आणि Redmi Note 5 Pro स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला सेल दरम्यान लवकरात लवकर डिवाइस आपल्या कार्ट मध्ये टाकून चेकआउट पेज वर जावे लागेल.
Redmi Note 5 च्या 3GB रॅम/32GB स्टोरेज ची किंमत 9,999 रुपये, तर 4GB रॅम/64GB स्टोरेज ची किंमत 11,999 रुपये असेल. हा फोन ब्लॅक, गोल्ड, लेक ब्लू आणि रोज गोल्ड कलर वेरियंट मध्ये उपलब्ध होईल. तर, Redmi Note 5 Pro च्या 4GB रॅम/64GB स्टोरेज ची किंमत 13,999 रुपये, आणि 6GB रॅम/64GB स्टोरेज ची किंमत 16,999 रुपये असेल. Redmi Note 5 Pro ब्लॅक, गोल्ड, लेक ब्लू आणि रोज गोल्ड कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध होईल.
सोबत, शाओमी चे दोन्ही फोंस रिलायंस जियो च्या 2200 रुपयांच्या कॅशबॅक ऑफर सह येतील. म्हणजे, Redmi Note 5 आणि Redmi Note 5 Pro च्या ग्राहकांना 4.5TB 4G डाटा मिळेल, त्यासाठी त्यांच्याकडे जियो चे सिमकार्ड असले पाहिजे.
Redmi Note 5 च्या स्पेसफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोन मध्ये 5.99 इंचाचा फुल HD डिस्प्ले असेल, डिस्प्ले चे रिजॉल्यूशन 1080×2160 पिक्सल आणि एस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे, सोबतच 2.5D कर्व्ड ग्लास आहे यात. हा फोन एड्रीनो 506 GPU सह 2GHz ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 625 वर चालेल. फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर बॅक साइडला असेल. हा फोन MIUI 9 आउट ऑफ द बॉक्स वर आधारित एंड्रॉयड नौगट वर चालतो.
या फोन मध्ये f/2.2 अपर्चर सह 12MP चा रियर आणि LED सेल्फी फ्लॅश सह 5MP चा फ्रंट कॅमेरा असेल. हा डुअल सिम फोन 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ, माइक्रो USB आणि 3.5mm हेडफोन जॅक सपोर्टिव आहे फोन ची बॅटरी 4000mAh ची आहे.
Redmi Note 5 Pro च्या स्पेसफिकेशन बद्दल बोलायाचे झाले तर हा स्मार्टफोन मध्ये 5.99 इंचाचा फुल HD डिस्प्ले आहे, डिस्प्ले चे रिजॉल्यूशन 1080×2160 पिक्सल आणि एस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे, सोबतच यात 2.5D कर्व्ड ग्लास आहे. हा फोन एड्रीनो 509 GPU सह ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 636 SoC वर चालेल.
फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर बॅक साइडला असेल. या फोन मध्ये f/2.2 अपर्चर सह 12MP+5MP चा डुअल रियर कॅमेरा आणि LED सेल्फी लाइट सह 20MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा डुअल सिम फोन 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ, माइक्रो USB आणि 3.5mm हेडफोन जॅक सपोर्टिव आहे आणि फोन ची बॅटरी 2.0 क्विक चार्ज सह 4000mAh ची आहे.