मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने अलीकडेच भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 3 लाँच केला. हा स्मार्टफोन ९ मार्चला भारतात पहिल्यांदा विक्रीसाठी mi.com अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध होईल.
कंपनीने अशी माहिती दिली आहे की, केवळ २४ तासांतच रेडमी नोट 3 ला ३,५०,००० रजिस्ट्रेशन मिळाले. ह्या फोनची बुकिंग ३ मार्चपासून संध्याकाळी ४ वाजल्यापासून सुरु आहे.
हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 650 ने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्याला भारतात दोन स्टोरेज प्रकारात लाँच केले आहे 16GB आणि 32GB. ह्याची किंमत आहे क्रमश: ९,९९९ रुपये आणि११,९९९ रुपये आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनला भारतात फ्लॅशसेलच्या माध्यमातून अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडिलसह Mi स्टोर्सवर ९ मार्चपासून खरेदी केला जाऊ शकतो.
शाओमी रेडमी नोट ३ स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांवाषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण IPS डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल. हा स्मार्टफोन पुर्णपणे मेटल यूनीबॉडीने बनला आहे. ह्याचे वजन केवळ १६४ ग्रॅम आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसर दिले गेल आहे. असे पहिल्यांदाच घडत आहे की, भारतामध्ये ह्या प्रोसेसरमध्ये एखादा स्मार्टफोन लाँच झाला आहे. हा एक हेक्सा कोर प्रोसेसर आहे, ज्यात २ कोर्टेक्स-A72 कोर्स आणि 4 कोर्टेक्स-A53 कोर्सने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये एड्रेनो ५१० GPU सुद्धा दिला गेला आहे. स्मार्टफोन दोन स्टोरेज प्रकारामध्ये म्हणजेच 6GB/32GB मध्ये मिळेल, ज्यात क्रमश: 2GB आणि 3GB चे रॅम दिले गेल आहे. हा स्मार्टफोन सिल्वर, डार्क ग्रे आणि गोल्ड रंगात उपलब्ध होईल.
त्याचबरोबर ह्यात १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा ड्यूल LED फ्लॅशसह दिला गेला आहे. जो आपल्याला फेज डिटेक्शन ऑटोफोकससह मिळत आहे. त्याशिवाय फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे, जो f/2.0 अॅपर्चरने सुसज्ज आहे. स्मार्टफोनमध्ये 4050mAh क्षमतेची नॉन-रिमूव्हेबल बॅटरीसुद्धा असू शकते, जो फास्ट चार्जिंग सपोर्टसह आपल्याला मिळत आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा दिला गेला आहे.
हेदेखील वाचा – व्हॉट्सअपने पाठ फिरवल्यानंतर आता ब्लॅकबेरी BBM ला आणणार नव्या रुपात
हेदेखील वाचा – 12,000 च्या किंमतीत उत्कृष्ट बॅटरी लाइफसह येणारे दोन उत्कृष्ट स्मार्टफोन