प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माताची आगामी Redmi Note 14 सीरीज लवकरच भारतीय बाजारात लवकरच लाँच होणार आहे. Redmi ने भारतात या सिरीजची लॉन्चिंग देखील टीज केली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कंपनीचा Redmi A4 5G स्मार्टफोन उद्या म्हणजेच 20 नोव्हेंबर 2024 रोजी लाँच केला जाईल. दरम्यान, आता कंपनी भारतात Redmi Note 14 सीरीजच्या लाँचसाठी सज्ज झाली आहे. लाँचपूर्वी काही लीक रिपोर्टमध्ये सीरिजचे खास स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Redmi Note 14 सिरीजचे भारतीय लॉन्चिंग तपशील-
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Xiaomi ने या महिन्याच्या सुरुवातीला पुष्टी केली होती की, Redmi Note 14 सीरीज डिसेंबर 2024 च्या सुरुवातीला लाँच केली जाईल. त्यानंतर, कंपनीने जारी केलेल्या टीझरमध्ये Redmi Note 14 सिरीजचा तपशील शेअर केलेला नाही. मात्र, ही सिरीज लवकरच रिलीज होणार असल्याची पुष्टी झाली आहे. या सिरीजअंतर्गत तीन मॉडेल लॉन्च केले जातील.
होय, या सिरीज अंतर्गत Redmi Note 14, Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro+ या स्मार्टफोन्सचा समावेश असेल. तुमच्या माहितसाठी सांगतो की, हे तिन्ही फोन्स आधीच चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, या स्मार्टफोनचे अनेक तपशील जागतिक प्रकारांमध्ये देखील पाहायला मिळेल, असे अपेक्षित आहे.
लीकनुसार, Redmi Note 14 Pro+ मध्ये 200MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 50MP टेलिफोटो सेन्सर मिळू शकतो. तर, प्रो व्हेरियंटमध्ये 50MP मुख्य कॅमेरा असेल. Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 pro+ स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच कर्व एज OLED पॅनल दिला जाऊ शकतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी, यात डायमेन्सिटी 7300 अल्ट्रा प्रोसेसर प्रो व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. तर, स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 प्रोसेसर प्रो प्लस व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहे.
एवढेच नाही तर, पाणी आणि धुळीपासून बचाव करण्यासाठी दोन्ही स्मार्टफोनमध्ये IP69 रेटिंग देण्यात आली आहे. त्याबरोबरच, Redmi Note 14 Series स्मार्टफोन्स Android 14 वर आधारित HyperOS 2.0 वर कार्य करतील, अशी अपेक्षा आहे. पॉवर बॅकअपसाठी, Redmi Note 14 pro मध्ये 5500mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगसह येते. तर, Pro Plus मध्ये 6200mAh बॅटरी आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कंपनी लवकरच Redmi Note 14 सीरीजच्या लॉन्चची तारीख जाहीर करू शकते, अशी अपेक्षा आहे, मात्र फोन्सची नेमकी किंमत आणि फीचर्स लाँचदरम्यानच पुढे येतील.