Redmi Note 14 Series First Sale: नवीनतम स्मार्टफोन सिरीजची पहिली सेल भारतात आज, पहा Best ऑफर्स

Redmi Note 14 Series First Sale: नवीनतम स्मार्टफोन सिरीजची पहिली सेल भारतात आज, पहा Best ऑफर्स
HIGHLIGHTS

Redmi ची नवी Redmi Note 14 5G सिरीज नुकतेच भारतीय बाजारात लाँच

सीरीज अंतर्गत Redmi Note 14 5G, Redmi Note 14 Pro 5G आणि Redmi Note 14 Pro+ 5G फोन्स समाविष्ट

या स्मार्टफोन्समध्ये 50MP मेन कॅमेरासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi ची नवी Redmi Note 14 5G सिरीज नुकतेच भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे. या फोनची विक्री आजपासून भारतीय बाजारात सुरू झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पहिल्या सेलदरम्यान या सिरीजमधील स्मार्टफोन स्वस्तात डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. कंपनीने या सीरीज अंतर्गत Redmi Note 14 5G, Redmi Note 14 Pro 5G आणि Redmi Note 14 Pro+ 5G असे तीन स्मार्टफोन सादर केले. हे तीन स्मार्टफोन वेगवेगळ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी दाखल होणार आहेत.

Also Read: Best 50MP Camera Smartphones under 7000: कमी किमतीत उत्तम कॅमेरासह येतात ‘हे’ स्मार्टफोन्स, पहा यादी

Redmi-Note-14-5G

Redmi Note 14 5G सिरीजची पहिली विक्री

Redmi Note 14 5G ची विक्री Amazon वर आज दुपारी 12 वाजता सुरू होईल. तर, Redmi Note 14 Pro 5G आणि Redmi Note 14 Pro+ 5G ची विक्री Flipkart वर 12 वाजता सुरू होईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये, या सिरीजमधील स्मार्टफोन्सवर 1000 रुपयांची झटपट सूट उपलब्ध असेल. मात्र, ही ऑफर ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास उपलब्ध आहे.

Redmi Note 14 5G ची किंमत:

  • 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत = 18,999 रुपये आणि
  • 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत = 20,999 रुपये.

Redmi Note 14 Pro 5G ची किंमत:

8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत = 23,999 रुपये आणि

8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत = 25,999 रुपये

Redmi Note 14 Pro+ 5G ची किंमत

  • 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत= 29,999 रुपये
  • 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत = 31,999 रुपये आणि
  • 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत = 34,999 रुपये

Redmi Note 14 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 14 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच लांबीचा OLED डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 7025 Ultra प्रोसेसर मिळणार आहे. त्याबरोबरच, हा फोन 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 20MP फ्रंट कॅमेरासह येतो. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 5,110mAh च्या मजबूत बॅटरीने सुसज्ज आहे.

Redmi Note 14 Pro

Redmi Note 14 Pro 5G मध्ये 6.67 इंच OLED डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 Ultra चिपसेट उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, हँडसेटमध्ये 50MP प्राथमिक लेन्स, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो लेन्स आहेत, तर 20MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5,500mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Redmi Note 14 Pro+ मध्ये 6.67 इंच लांबीचा OLED कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज मिळेल. फोटोग्राफीसाठी, हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. या फोनमध्ये देखील तुम्हाला 50MP मुख्य कॅमेरा आणि 20MP फ्रंट कॅमेरा मिळेल. तर, पॉवर बॅकअपसाठी, हा हँडसेट 6200mAh बॅटरीसह येतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo