108MP मेन कॅमेरासह Redmi Note 13R Pro 5G टेक विश्वात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News 

108MP मेन कॅमेरासह Redmi Note 13R Pro 5G टेक विश्वात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News 
HIGHLIGHTS

Redmi Note 13 सिरीजमधील आणखी एक बजेट 5G स्मार्टफोन लाँच

स्मार्टफोन फक्त 12GB RAM + 256GB स्टोरेज या सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच केला गेला आहे.

Redmi चा हा फोन 108MP कॅमेरा, 12GB रॅम सारख्या फीचर्ससह येतो.

Xiaomi ने Redmi Note 13 सिरीजमधील आणखी एक बजेट 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. Redmi चा हा फोन 108MP कॅमेरा, 12GB रॅम सारख्या फीचर्ससह येतो. यापूर्वी, Redmi ने या सिरीजमधील Redmi Note 13, Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro+ फोन बाजारात लाँच केले आहेत. नव्या फोनमध्ये इतर अनेकउत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामुळे हा बजेट फोन खास बनतो, असे म्हटले जात आहे.

हे सुद्धा वाचा: Excellent Offer! Jio AirFiber च्या प्लॅन्समध्ये संपूर्ण महिन्यासाठी Netflix, Prime आणि अनेक OTT सबस्क्रिप्शन Free

Redmi Note 13R Pro 5G किंमत आणि उपलब्धता

हा Redmi स्मार्टफोन फक्त 12GB RAM + 256GB स्टोरेज या सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच केला गेला आहे. या स्मार्टफोनची किंमत CNY 1,999 म्हणजेच अंदाजे 23,000 रुपये आहे. तुम्ही हा फोन मिडनाईट ब्लॅक, टाइम ब्लू आणि मॉर्निंग लाइट गोल्ड या तीन कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. लक्षात घ्या की, हा फोन चीनच्या बाजारात लाँच करण्यात आला आहे. लवकरच हा फोन भारतीय बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे.

Redmi Note 13R Pro
Redmi Note 13R Pro

Redmi Note 13R Pro

डिस्प्ले

हा Redmi स्मार्टफोन 6.67 इंच OLED डिस्प्ले सह येतो. फोनच्या डिस्प्लेमध्ये पंच-होल डिझाइन देण्यात आले आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले FHD+ ला सपोर्ट करतो. तसेच, फोनचा डिस्प्ले 120Hz उच्च रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

प्रोसेसर

Redmi Note 13R Pro मध्ये MediaTek Dimensity 6080 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB LPDDR4x रॅम आणि 256GB UFS 2.2 स्टोरेजचा सपोर्ट आहे.

कॅमेरा

या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यात 108MP प्रायमरी कॅमेरा आहे, ज्यासोबत 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 3x इन-सेन्सर झूम सपोर्टसह येतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16MP कॅमेरा असेल.

बॅटरी

हा फोन 5,000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग USB टाइप C फीचर्ससह येतो. यात Android 13 वर आधारित MIUI 14 आहे. याशिवाय, हे साइड माउंटेड फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सरसह येते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo